बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने गेल्यावर्षी २४ डिसेंबरला दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शूरा खान बरोबर अरबाज लग्नबंधनात अडकला. अरबाज व शूराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. शूरा खानबरोबर लग्न केल्यानंतर अरबाजने मलायकाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले असल्याची माहिती समोर आली आहे.

अरबाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अरबाजने शूरा खानबरोबर लग्न केल्यानंतर त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, दुसऱ्या लग्नानंतर अरबाजने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका आरोराला अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. अरबाज इनस्टाग्रामवर फक्त १२७ जणांना फॉलो करतो. यामध्ये त्याचा भाऊ सलमान खान, सोहेल खान आणि त्याचा मुलगा अरहान खान यांचा समावेश आहे. मात्र, या यादीत मलायकाचा समावेश नाही.

हेही वाचा- भेटवस्तू नको तर…, आयरा खानच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास नियम; द्यावी लागणार ‘ही’ गोष्ट

मलायकाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने तिला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. मात्र, २०१७ मध्ये त्याने पुन्हा तिला फॉलो करायला सुरुवात केली. यानंतर अरबाजने पुन्हा मलायकाला कधी अनफॉलो केले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तर दुसरीकडे मलायका अरोराही अजूनही अरबाज खानला फॉलो करत आहे. मलायकाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सच्या यादीत प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर या कलाकारांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका अरोरा व अरबाज खानने १९९८ लग्नगाठ बांधली होती. मात्र, १९ वर्षांच्या संसारानंतर मे २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज व मलायकाला एक मुलगाही आहे. त्याचे नाव अरहान आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. तर अरबाज जॉर्जियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले आणि आता त्याने शुरा खानशी लग्नगाठ बांधली आहे. तर अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर आता मलायकाही अर्जून कपूरबरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरु आहे.