प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंहचे जगभरात लाखो चाहते आहेत. ‘आशिकी-२’ चित्रपटापासून अरिजित रातोरात स्टार झाला आणि आता त्याचे प्रत्येक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होते. देश-विदेशातील विविध भागांमध्ये अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले जाते. मात्र, सध्या चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आलेला अरिजित सिंहचा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. अरिजित सिंहच्या आयोजकांनी एका फर्मविरुद्ध FIR दाखल केला आहे.
हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल; ‘या’ कारणामुळे बिघडली तब्येत
मिळालेल्या माहितीनुसार सेक्टर-३४ प्रदर्शन मैदानावर आज (२७ मे) रोजी अरिजित सिंहच्या कॉन्सर्टचे आयोजन कऱण्यात आले होते. मात्र, आयोजकांनी एका फर्मविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी २७ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीवर कारवाई करून, पोलिसांनी सेक्टर १७ मधील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१८ (व्यक्तीची फसवणूक), ४२० (फसवणूक) आणि १२०-बी (गुन्हेगारी कट) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे अरिजित सिंहचा आज (२७ मे रोजी) होणारा कॉन्सर्ट तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. चंदीगढमधील खराब हवामानामुळे शो पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, अद्याप कॉन्सर्टची नवी तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- Video : “हा मूर्खपणा…”; सलमानकडून मिळालेल्या ‘त्या’ वागणुकीवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला,…
काही दिवसांपूर्वी अरिजित सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ अरिजितच्या पश्चिम बंगालमधील गावातील होता. या व्हिडीओत अरिजित लुंगी आणि टीर्शट घालून किराणा माल खरेदीसाठी स्कूटीवरून जाताना दिसला होता. हा व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी अरिजितच्या साध्या राहणीमानाचे कौतुक केले होते.