scorecardresearch

अरिजित सिंग लाइव्ह कॉन्सर्टच्या एका तिकिटाची किंमत तब्बल १६ लाख! नेटकरी म्हणाले, “इतके पैसे देऊन तिथे रडण्यापेक्षा…”

त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिट दराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरिजित सिंग लाइव्ह कॉन्सर्टच्या एका तिकिटाची किंमत तब्बल १६ लाख! नेटकरी म्हणाले, “इतके पैसे देऊन तिथे रडण्यापेक्षा…”

अरिजित सिंग हा आपल्या देशातील आघाडीचा गायक आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. त्याने आतापर्यंत असंख्य एक से बढकर एक सुपरहिट गाणी दिली आहेत. अरिजित सिंगचे करोडो चाहते आहेत. त्या चाहत्यांना अरिजितचे गाणे प्रत्यक्ष ऐकता यावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सचेही आयोजन केले जाते. पण आता त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिट दराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून चहा ते त्याच्या कॉन्सर्टकडे पाठ फिरवणार असं दिसतंय.

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात अरिजित सिंगच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्सर्टच्या बुकिंगचा एक स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत दिसते आहे. या व्हायरल फोटोनुसार अरिजितच्या कॉन्सर्टच्या एका तिकिटाची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे.

आणखी वाचा : प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”

या फोटोमध्ये विविध प्रकारच्या तिकिटांचे दर दिसत आहेत. या कॉन्सर्टच्या तिकिटांची सुरुवात ९९९ रुपयांपासून होत आहे. तर याचे सर्वात महागडे तिकिट १६ लाख रुपयांचे आहे. हे १६ लाख रुपयांचे तिकिट प्रीमियम लाउंज या कॅटेगरीतील आहे. म्हणूनच त्याचे दर एवढे जास्त असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय १२ आणि १४ लाखाचेही तिकिट आहे. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर या फोटोवर भन्नाट कमेंट्स येत आहेत.

हेही वाचा : अरिजित सिंगचं भावनिक आवाहन….”एकही जीव या महामारीने जाता कामा नये….”

अरिजितने आतापर्यंत गायलेली जास्तीत जास्त गाणी ही सॅड साँग आहेत. त्यामुळे “रडण्यासाठी १६ लाख कुणी खर्च करू नये,” अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. दुसरा नेटकरी म्हणाला, “१६ लाख रुपये खर्च करून तिथे रडण्यापेक्षा मी एकटा घरी रडेन.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “१६ लाखात अरिजीतच्या शेजारी घर घेऊ म्हणजे रोज त्याचे गाणे ऐकता येईल.” हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 16:05 IST

संबंधित बातम्या