"तुमच्या कर्माची फळं..." अर्जुन कपूरचा राग शांत होईना, ४९व्या वर्षी मलायका गरोदर आहे म्हणणाऱ्यांना पुन्हा सुनावलं | arjun kapoor angry reaction on malaika arora pregnancy rumours see details | Loksatta

“तुमच्या कर्माची फळं…” अर्जुन कपूरचा राग शांत होईना, ४९व्या वर्षी मलायका गरोदर आहे म्हणणाऱ्यांना पुन्हा सुनावलं

मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चांवरुन अर्जुन कपूरचा राग अजूनही शांत झालेला नाही. याबाबत त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

“तुमच्या कर्माची फळं…” अर्जुन कपूरचा राग शांत होईना, ४९व्या वर्षी मलायका गरोदर आहे म्हणणाऱ्यांना पुन्हा सुनावलं
मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चांवरुन अर्जुन कपूरचा राग अजूनही शांत झालेला नाही. याबाबत त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

मलायका अरोरा व अर्जून कपूरचं नातं कोणापासून लपून राहिलेलं नाही. दोघांनी जाहिरपणे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. आता मलायका गरोदर असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. ४९व्या वर्षी मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण ही बातमी ऐकताच अर्जून व मलायकाला राग अनावर झाला. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – Video : नखांवरच कोरली लग्नाची तारीख अन्…; राणादाच्या पाठकबाईंचा लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

‘पिंकविला’ने मलायका गरोदर असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अर्जुनने त्या बातमीचा स्क्रिनशॉट काढत संताप व्यक्त केला. “अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”, असं अर्जुनने म्हटलं होतं.

अर्जुनने आता आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अर्जुनने म्हटलं की, “प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ मिळतात. आयुष्यभर तुम्ही इतर लोकांशी वैर करू शकत नाही. तुम्ही कोण आहात? याचा मला फरक पडत नाही. तुम्ही जसं वागणार तसंच तुम्हाला सगळं परत मिळणार. ब्रम्हांड तुम्हाला तुमच्या कर्माची फळं लवकर किंवा उशीर का होईना पण देणारच.”

आणखी वाचा – Video : जोरदार भांडण अन् नंतर पॅनिक अटॅक, निमृत कौरच्या आजाराची शालीन भानोतने उडवली खिल्ली, पुढे काय घडलं पाहा?

अर्जुनचा राग अजूनही कमी झालेला नाही हे त्याच्या या पोस्टवरुन दिसून येतं. मलायका व अर्जुन गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी मात्र दोघंही त्रस्त झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:09 IST
Next Story
बिग बींच्या नातीची खवय्येगिरी; रस्त्याच्या कडेला चाट-पापडीचा आस्वाद घेताना दिसली नव्या, फोटो चर्चेत