Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora: बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या जोडप्यांपैकी एक मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांचं नातं तुटल्याची चर्चा होती; मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर अर्जुनने ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे. मलायका व अर्जुन सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता अर्जुनने तो सिंगल असल्याचं म्हटलं आहे.

अर्जुन कपूरचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठी इथे टीम पोहोचली होती. रोहित शेट्टी व टायगर श्रॉफदेखील इथे आले होते. ‘फिल्मीज्ञान’च्या या व्हिडीओत अर्जुनच्या शेजारी मनसे प्रमुख राज ठाकरे उभे दिसत आहेत. याचठिकाणी बोलताना अर्जुनने त्याच्या व मलायकाच्या ब्रेकअपची पुष्टी केली.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा – “मी काहीही केलं तरी…”, अभिषेक बच्चनला डेट करण्याच्या चर्चांबाबत निम्रत कौरचे वक्तव्य

अर्जुनने हातात माईक घेताच गर्दीतून लोक मलायकाचं नाव घेतात. हे ऐकून अर्जुन म्हणतो ‘मी सिंगल आहे’. त्यानंतर तो म्हणाला, “माझी ओळख ‘टॉल व हँडसम’ अशी ओळख करून दिली त्यामुळे वाटलं की लग्नाबाबत बोलणार आहेत, त्यामुळे मी असं म्हटलं.” अर्जुनने उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – Video: किंग खानने सासूबाईंबरोबर धरला ठेका; शाहरुख खान अन् सविता छिब्बर यांचा व्हिडीओ पाहिलात का?

पाहा व्हिडीओ –

२०१८ पासून एकत्र होते अर्जुन- मलायका

मलायका अरोराचं लग्न अरबाज खानशी झालं होतं. त्यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करू लागली. मलायका व अर्जुन कपूर २०१८ पासून एकत्र होते. दोघांनी त्यांचं नातं लपवून ठेवलं नव्हतं. ते एकमेकांबरोबरचे व्हेकेशनचे फोटो शेअर करायचे. अर्जुनही मलायकाबरोबरच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलायचा, मात्र मागील काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. अखेर हे नातं संपल्याचं अर्जुननेच सांगितलं आहे.

हेही वाचा – काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

‘सिंघम अगेन’मध्ये कलाकारांची मांदियाळी

अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘सिंघम अगेन’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, दयानंद शेट्टी हे कलाकार आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader