बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर एकेकाळी सोनाक्षी सिन्हासोबत रिलेशनशिपमध्ये होता. ‘तेवर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात रिलेशनशिप असल्याची अफवा पसरली होती, परंतु चित्रपट पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे नाते संपुष्टात आले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता अर्जुनने या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनला त्याच्या आणि सोनाक्षीच्या नात्याबद्दल विचारलं असता तो म्हणाला, काही नाती टिकून राहतात तर काही फार काळ टिकत नाहीत. एकदा प्रोजेक्ट संपला की मग लोकांना त्यांच्या वेगळ्या मार्गाने जावे लागते.

हेही वाचा… “शेवटी नैनाने तिच्या तालावर…”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अपुर्वा सकपाळ व ध्रुव दातार यांचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, चाहते म्हणाले…

अर्जुनने व्यक्त केलं की, त्याला अजूनही सोनाक्षीबद्दल खूप आदर आहे आणि असंही स्पष्ट केलं की, ते जेव्हा एकमेकांना इव्हेंटमध्ये भेटतात तेव्हा नातं चांगलं टिकून राहावं याच्या कोणत्याही दबावाशिवाय ते अगदी उत्तम प्रकारे एकमेकांना भेटतात.

डीएनएमधील रिपोर्टनुसार असं सुचवण्यात आलं की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मूलभूत फरक हे त्यांच्या ब्रेकअपचं प्राथमिक कारण होतं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी तिच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करते आणि तिला ज्यांची काळजी वाटते, प्रेम वाटतं, अशा भावना ती दिलखुलासपणे व्यक्त करते. याउलट अर्जुनचा स्वभाव असल्याने त्याला लगेच व्यक्त होता येत नाही.

तर दुसर्‍या सूत्राच्या माहितीनुसार, अनेक लोकांप्रमाणेच सोनाक्षीलाही अर्जुनबरोबर बराच वेळ घालवायचा होता, त्यामुळे सततची जवळीक आणि वारंवार येणारे कॉल्स यामुळे त्याला काहीसं गुदमरल्यासारखं वाटत होतं. त्याला वाटलं की हे सगळं खूप लवकर होतंय. सूत्राने असंही सांगितलं की, त्यांच्या ब्रेकअपसाठी दोघांपैकी एकाला दोष देणे अयोग्य आहे.

हेही वाचा… “करण जोहरला तुला भेटण्याची इच्छा नाही” हे ऐकताच ‘या’ अभिनेत्याचं दुखावलं मन, किस्सा सांगत म्हणाला…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून २०२४ रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी सोनाक्षीच्या लग्नाचे आमंत्रण आल्याची ‘इंस्टंट बॉलीवुड’ला दिलेल्या मुलाखतीत पुष्टी दिली. पूनम यांनी शेअर केलं की, त्या सोनाक्षीला लहानपणापासून ओळखतात आणि तिचा संपूर्ण प्रवास त्यांनी बघितला आहे.

हेही वाचा… “सूसेकी…”, सुकन्या मोनेंना पडली ‘पुष्पा-२’ च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सोनाक्षी व झहीर यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात सोनाक्षी व झहीर झळकले होते. या चित्रपटानंतरच दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. मात्र, सोनाक्षी किंवा झहीरने कधीच जाहीरपणे त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. आता २३ जून रोजी ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप झहीर किंवा सोनाक्षीने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.