Anshula Kapoor Rohan Thakkar Engagement : निर्माते बोनी कपूर व त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची लेक आणि बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने साखरपुडा केला आहे. अंशुलाने आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिने बॉयफ्रेंड रोहन ठक्करबरोबर साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अंशुलाने तिच्या साखरपुड्याचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंबरोबर जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीने एक छान कॅप्शन लिहिलं आहे. अंशुला कपूर व रोहन ठक्कर यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सेलिब्रिटी व चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अंशुला कपूरने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अंशुला उभी असते आणि तिचा बॉयफ्रेंड गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज करतो. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करत आहेत. पोस्टमध्ये अंशुला कपूरने तिची डायमंड रिंगही फ्लॉन्ट केली आहे.

साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अंशुला कपूरने लिहिलं, “आम्ही एका अॅपवर भेटलो. मंगळवारी रात्री १.१५ वाजता आम्ही बोलायला सुरुवात केली आणि सकाळी ६ वाजेपर्यंत बोलत राहिलो. ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीची सुरुवात असल्यासारखं वाटलं. ३ वर्षांनंतर, त्याने माझ्या आवडत्या शहरातील सेंट्रल पार्कमधील राजवाड्यासमोर प्रपोज केलं. भारतीय वेळेनुसार अगदी पहाटे १.१५ वाजता. तो क्षण जादूई वाटावा म्हणून जणू जग क्षणभर थांबलं. एक शांत प्रेम जे घरासारखा अनुभव देतं.”

पाहा पोस्ट

अंशुलाने पुढे लिहिलं, “मी कधीच परीकथांवर विश्वास ठेवला नाही पण रोहन ठक्करने मला त्या दिवशी जे दिलं ते बेस्ट होतं. त्याने ते जाणीवपूर्वक केलं होतं, ते खरं होतं. मी त्याला हो म्हणाले. अश्रू, हास्य आणि असा आनंद जो मी शब्दांत व्यक्त6 करू शकत नाही कारण २०२२ पासून ते तूच माझं सर्वस्व आहेस. मी माझ्या सर्वात बेस्ट फ्रेंडशी साखरपुडा केलाय. माझी आवडती व्यक्ती, आवडते शहर आणि आता माझा आवडता होकार.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशुला कपूरचा होणारा पती रोहन ठक्कर कोण आहे?

Who is Rohan Thakkar : अंशुला कपूरचा होणारा पती रोहन ठक्कर हा पटकथा लेखक आहे आणि त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातून फिल्म व क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला आहे. त्याने सोशल मीडिया मार्केटिंगसाठी कॉपीरायटिंग देखील केलं आहे. याशिवाय रोहनने ‘द नोबलेस्ट’ चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. सध्या रोहन ठक्कर मुंबईत राहतो.