Anshula Kapoor Rohan Thakkar Wedding Photo Out: लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशूला कपूर हिने आज (६ जुलै रोजी) तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्कर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. रोहन व अंशूला यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. त्यांचा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अंशूला कपूरच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना २१ जून रोजी तिच्या मुंबईतील घरी आयोजित केलेल्या ‘माता की चौकी’ने झाली. या समारंभाला कपूर कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये सोनम कपूर, रिया कपूर, सुनीता कपूर, हर्षवर्धन कपूर, अनिल कपूर, महीप कपूर, शनाया कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर आले होते. मेहंदी, संगीत, हळदी समारंभानंतर आज अंशूला व रोहन लग्नबंधनात अडकले.

अंशूला कपूर व रोहन ठक्कर यांचं लग्न मुंबईतील ‘ताज लँड्स एंड’ इथे पार पडलं. लग्नातील अशूला व रोहनच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. अंशूला कपूर पीच रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती, तर रोहन ठक्कर सोनेरी-पेस्टल रंगाच्या शेरवानीमध्ये रुबाबदार दिसत होता.

anshula-kapoor-rohan-thakkar-wedding-photo-mumbai
अंशूला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा लग्नातील पहिला फोटो आला समोर.

अंशूला कपूर व रोहन ठक्कर लव्ह स्टोरी

अंशूला आणि रोहन यांची पहिली भेट त्यांच्या कॉमन मित्रांच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अंशुलाने २०२२ मध्ये मालदीव ट्रिपमधील रोहनबरोबरचे फोटो शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये, खासकरून कपूर कुटुंबाच्या पार्ट्यांमध्ये रोहन नेहमी अंशूलाबरोबर दिसायचा.

काय करतो रोहन ठक्कर?

रोहन ठक्कर हा स्क्रीनरायटर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. रोहन हा गुजराती आहे. पण त्याच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

बोनी कपूर व त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे अंशूला कपूर

अंशूला कपूर ही बोनी कपूर व त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची मुलगी आहे. अशूला अर्जुन कपूरची सख्खी बहीण असून जान्हवी कपूर व खुशी कपूर यांची सावत्र बहीण आहे. अशूलाचा जन्म २९ डिसेंबर १९९० रोजी झाला होता. सध्या अंशूला ३५ वर्षांची आहे.