अभिनेता आयुष शर्माने सलमान खानची बहीण अर्पिता खानशी लग्न केलं आहे. आयुषने सलमानला पहिल्यांदा भेटला तेव्हा काय घडलं होतं याबाबत माहिती दिली आहे. सलमानला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी पैसे कमवत नव्हतो, असं तो म्हणाला. अर्पिता व आयुष एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत होते आणि त्याचदरम्यान आयुष सलमानला त्याच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भेटला होता.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना दिलेल्या मुलाखतीत आयुषने सांगितलं की एके दिवशी उशीरा रात्री तो अर्पिताला सोडायला घरी गेला होता. अर्पिताने त्याला घरात बोलावलं, सुरुवातीला आयुष संकोच करत होता, पण अर्पिताने त्याला निवांत राहा असं सांगितलं. रात्रीच्या १ वाजता ते सर्वजण जेवत होते आणि टीव्ही पाहत होते, तिथे सलमान खान आला. “तो तिथे आला आणि मी त्याच्या मागे उभा होतो. माझ्या डोक्यात फक्त प्यार किया तो डरना क्या हेच विचार सुरू होते, तो मागे वळला आणि मी स्वतःची ओळख करून दिली, ‘हाय सर, मी आयुष शर्मा’. तो म्हणाला, ‘मी सलमान खान आहे’. आणि यानंतर मी तिथून निघालो,” असं आयुष म्हणाला.

लोकप्रिय अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म, आनंद व्यक्त करत म्हणाला…

आयुष म्हणाला, दुसऱ्या दिवशी मला अर्पिताचा फोन आला की सलमानला मला भेटायचं आहे. मग आम्ही भेटलो आणि सलमानने मला भविष्यात काय करायचंय असं विचारलं. मी सांगितलं की मला अभिनेता व्हायचंय. हे ऐकून सलमान म्हणाला, “तुला अभिनय येत नाही. त्याला कसं कळालं याचं मला आश्चर्य वाटलं. मग तो म्हणाला तुला अभिनय शिकावा लागेल, तरंच तू अभिनेता होऊ शकतोस.”

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

सलमानने आयुषला त्याच्या भविष्याबद्दल विचारल्यावर त्याने अर्पिताशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. “मी त्यावेळी फक्त २४ वर्षांचा होतो. तू किती पैसे कमवतो असं मला सलमानने विचारलं. मी म्हणालो मी काही करत नाही. माझे वडील मला पैसे पाठवतात आणि त्यावर मी जगतोय. घरचे श्रीमंत आहेत, पण मी पैसे कमवत नाही. त्याने अर्पिताकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘हा मुलगा खूप प्रामाणिक आहे’. तो लगेच म्हणाला, ‘मला हा मुलगा आवडलाय, लग्न ठरलं’,” अशी आठवण आयुषने सांगितली.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

सलमानने पसंती दिली होती, पण तोवर आपण आई-वडिलांनाही सांगितलं नव्हते की अर्पिताला डेट करत आहे, असं आयुष म्हणाला. त्यानंतर काही काळाने अर्पिता व आयुष लग्नबंधनात अडकले. अर्पिता आणि आयुष यांचे लग्न १० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झाले. त्यांना मुलगा आहिल आणि मुलगी आयत ही दोन अपत्ये आहेत.