Arshad Warsi upcoming movie : अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी याचा मोठा चाहता वर्ग आहे. कॉमेडी, ड्रामा आणि गंभीर भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अर्शद हा बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आपल्या अभिनयाने आणि अचूक विनोदी टायमिंगने त्याने गेली तीन दशके प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. २०२६ हे वर्ष अर्शदसाठी खास आहे. याचे कारण म्हणजे, या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, या एकाच वर्षात त्याचे तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत हे त्याचे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
- वेलकम टू द जंगल
‘वेलकम टू द जंगल’ हा लोकप्रिय ‘वेलकम’ चित्रपटाचा तिसरा भाग असणार आहे. येत्या २६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शक अहमद खान यांनी केले आहे. यामध्ये ॲक्शन, कॉमेडी आणि थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये अर्शद वारसी आपल्या भन्नाट विनोदशैलीत प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यामधील त्याच्या खास भूमिकेची चर्चा रंगली आहे.
- धमाल ४
‘धमाल ४’ हा लोकप्रिय ‘धमाल’ फ्रँचायझीचा चौथा भाग असून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. यामध्ये विनोद, गोंधळ आणि मनोरंजन याचा तडका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
- प्रीतम अँड पेड्रो
‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटामध्ये अर्शद वारसी ‘प्रीतम’च्या भूमिकेत दिसणार असून त्याचा मिश्कील आणि विनोदी अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी जिओ हॉटस्टार ओटीटी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. यामध्ये अर्शदची भूमिका पूर्णपणे वेगळी असल्याचे बोलले जात आहे. तसेच ‘पेड्रो’च्या भूमिकेत जावेद जाफरी दिसणार असून दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांचा ओटीटीवरील पहिला निर्मिती केलेला चित्रपट असणार आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’ यामध्ये अर्शद आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी हे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (2000) आणि ‘मुन्नाभाई’ (2000) नंतर तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत.
4. गोलमाल ५
अर्शद वारसी हा “गोलमाल ५’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपट ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पुढील भाग असून पहिल्या भागापासून अर्शद गोलमाल चित्रपटामध्ये झळकत आहे. या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच डिसेंबरमध्ये ‘गोलमाल ५’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
