बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने जया बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितल्याने चर्चेत आला आहे.

अर्शद वारसीने ‘अनफ़िल्टर्ड बाय समदीश’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कपडे व्यवस्थित न घातल्यामुळे जया बच्चन यांनी त्याला झापल्याची आठवण त्याने सांगितली आहे. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
Crime News
Crime News : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन मजुराची मारहाण करुन हत्या, गोरक्षा समितीच्या पाच सदस्यांना अटक
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Yerawada police arrested three people for robbed young man at gunpoint
पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…

काय म्हणाला अभिनेता?

अर्शद वारसी म्हणतो, “चित्रपटसृष्टीत मी त्यावेळी नवीन आलो होतो आणि माझे ज्ञान फारच कमी होते. मी एका वेगळ्याच दुनियेतून आलो होतो. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटासाठी आम्ही हैदराबादला शूटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी चड्डी- बनियान अशा कपड्यांमध्ये विमानात बसलो. आधीपण आम्ही असेच फिरायचो, डान्स करायचो. जेव्हा जयाजींना ही गोष्ट माहित झाली तेव्हा लगेच त्यांचा मेसेज आला की, मिस्टर वारसींनी कृपया हे कळवा की, जेव्हा ते प्रवास करतील त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत.”

हेही वाचा: Video: “डोळ्यात पाणी आणलंत…”, ड्रामा ज्युनिअर्सने ‘धर्मवीर’ चित्रपटातील केलेला ‘तो’ सीन पाहून प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

आणखी एक किस्सा सांगताना अभिनेत्याने म्हटले की, जेव्हा जया बच्चन यांनी त्याला चित्रपटाच्या प्रिमिअरला बोलवले होते, त्यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्यासमोरच स्पष्टपणे चित्रपट निरस असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला सांगितले की, त्याने त्याची मत अशाच प्रकारे स्पष्टपणे मांडले पाहिजे.

अर्शद वारसीचे लोकप्रिय चित्रपट

‘वैसा भी होता है पार्ट २’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘हलचल’, ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेता अर्शद वारसी ओळखला जातो. याबरोबरच, ‘असुर’ सीझन १ आणि ‘असुर’ सीझन २ मध्ये देखाल अभिनेत्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

‘जॉली एलएलबी ३’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून अर्शद वारसी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट धुमाकूळ घालणार का? प्रेक्षकांचे मन जिंकत चित्रपटगृहात गर्दी खेचून आणणार का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.