scorecardresearch

Video: कॅमेऱ्यासमोर केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे आर्यन खान पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले “पोलिसांनी इतकं मारलं…”

“चेहऱ्यावर कधीच…” आर्यन खान पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

aryan khan troll
आर्यन खान ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखचा मुलगा आर्यनला नुकतंच एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. आर्यनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा आर्यनला ट्रोल केलं आहे.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन आर्यन खानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आर्यनने एका बर्थडे पार्टीसाठी हजेरी लावली होती. या व्हिडीओमध्ये आर्यन गाडीतून येताना दिसत आहे. गाडीतून उतरल्यानंतर पापाराझी आर्यनला फोटोसाठी पोझ देण्यास सांगत आहेत. पण आर्यन त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून गेल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवरुन आर्यन पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”

आर्यनच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “याच्या चेहऱ्यावर कधीच हास्य नसतं” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “हा नेहमी वेगळ्याच अटिट्यूडमध्ये असतो. याला कधीच स्माइल करताना पाहिलेलं नाही” अशी कमेंट केली आहे. काहींनी त्याच्या कपड्यांवरुनही त्याला ट्रोल केलं आहे. “कपडे उंदराने खाल्ले आहेत का?” असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “पोलिसांनी इतकं मारलं की कपडे फाटले” असं म्हणत आर्यनची खिल्ली उडवली आहे. “घाईघाईत फाटलेले कपडे घातले वाटतं”, असंही एकाने म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बाजीप्रभू देशपांडेंचा फोटो अन्…; ‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने दाखवली विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराची झलक

आर्यन खान मनोरंजन विश्वातील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने नुकतंच त्याच्या आगामी प्रोजेक्टचं लिखाण पूर्ण केलं आहे. अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून आर्यन कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 11:51 IST