Premium

दुसऱ्या लग्नाचा निर्णय सांगितल्यावर पहिली पत्नी व २२ वर्षांच्या मुलाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, आशिष विद्यार्थींचा खुलासा

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरातच आशिष विद्यार्थींनी केलं दुसरं लग्न, लग्नाच्या निर्णयावर मुलगा व पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

ashish vidyarthi first wife son arth

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा होत आहे. आशिष यांनी रुपाली बरुआशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राजोशी उर्फ पिलू बरुआ असून या दोघांना अर्थ नावाचा २२ वर्षांचा मुलगादेखील आहे. गेल्यावर्षी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुलगा व पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल आशिष यांनी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “म्हातारा ही कमेंट…”, ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना आशिष विद्यार्थींनी सुनावलं

आशिष यांनी सांगितलं की घटस्फोटापूर्वी पहिली पत्नी पिलूशी खूप गहन चर्चा झाली, ते याबद्दल एकमेकांशी खूप बोलले आणि गोष्टी ठिक करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या करूनही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघेही एका मुलाचे पालक होते, त्यामुळे एका रात्रीत घटस्फोटाचा निर्णय घेतला नव्हता. “मी पिलूचा कधीही द्वेष करणार नाही किंवा माझ्या मनात तिच्याबद्दल कधीच वाईट विचार येणार नाही. कारण, ती फक्त माझ्या मुलाची आई नव्हती, तर माझी खूप चांगली मैत्रीण होती, त्यामुळे आमची मैत्री आयुष्यभर राहील,” असं ते म्हणाले.

हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन यांची नात ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याला करतेय डेट? दोघांचा व्हिडीओ व्हायरल

घटस्फोटानंतर आशिष यांना एकटं राहायचं नव्हतं, त्यामुळे दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी पहिल्या पत्नीला त्याबद्दल सांगितलं. त्यावर ‘माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तुझ्यापेक्षा वेगळा आहे’, अशी प्रतिक्रिया पिलू यांनी दिली होती. दरम्यान, आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर मुलाला आनंद झाला, असंही ते म्हणाले. एकत्र राहून एकमेकांना त्रास देण्यापेक्षा किंवा प्रॉब्लेम सोडवत राहण्यापेक्षा वेगळं होणं चांगलं, अशा मताचा तो आहे, असं आशिष यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 10:20 IST
Next Story
नसीरुद्दीन शाह यांची ‘ISRO’च्या प्रमुखांवर टीका; म्हणाले, “आपण पुन्हा अंधश्रद्धेकडे…”