scorecardresearch

Video: ….अन् आशुतोष राणांनी सर्वांसमोर राजकुमार रावच्या कानाखाली मारली, अभिनेत्याने केला खुलासा

त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वच जण आवक् झाले.

ashutosh rana

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेते आशुतोष राणा हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे अभिनेते आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या कामाने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. तर आता पहिल्यांदाच ते दोघं एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. आगामी ‘भीड’ या चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आशुतोष राणा यांनी राजकुमार रावच्या कानाखाली वाजवली असल्यास त्यांनी सांगितलं आहे.

करोनामुळे देशभरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. देशात अंतर्गत सीमा आखल्या गेल्या. अन्न- वस्त्र, निवारा, वाहतुकीची साधने अशा कोणत्याही मूलभूत सुविधा नाकारली गेलेली अनेक माणसे या काळात परागंदा झाली. अनेकांचे रोजगार गेले. लाखों लोकांनी आपआपल्या घरी परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. लॉकडाउनच्या काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाची टीम नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाली आणि यावेळी त्यांनी शूटिंग दरम्यानचे काही किस्से चाहत्यांशी शेअर केले.

हेही वाचा : “…तेव्हापासून मी प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देणे बंद केले,” राजकुमार रावने सांगितला धक्कादायक अनुभव

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आशुतोष राणा यांनी राजकुमार रावला कानाखाली मारलं असल्याचं त्यांनी या शोमध्ये सांगितलं. आशुतोष राणा यांचं हे बोलणं ऐकून सर्वच जण आवक् झाले. मग आशुतोष राणा आणि राजकुमार राव यांनी त्यावेळी नक्की काय घडलं होतं हे सांगितलं. कपिल शर्माने राजकुमारला विचारलं की, “ट्रेलरमध्ये एक भावूक सीन आहे ज्यात आशुतोष राणा तुझ्या कानाखाली मारतात. ते खूप खरे अभिनेते आहेत आणि अनुभव सिन्हा वास्तववादी दिग्दर्शक आहेत. त्यामुळे तुला असं कधी वाटलं का की हे खरोखरच आशुतोष यांना तुला मारायला सांगतील?” त्यावर राजकुमार म्हणाला, “त्यांनी खरंच मारलं.”

आणखी वाचा : ऑस्कर सोहळ्यात ‘RRR’च्या टीमला मिळाली नाही फ्री एन्ट्री, राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

पुढे आशुतोष राणा म्हणाले, “मी त्याला सांगत होतो की असं नको करूया. राजकुमार मला सांगत होता की तुम्ही मला खरंच मारा. मी म्हणालो नको; तो म्हणाला मारा. मग आमचे दिग्दर्शक आले आणि त्यांनी मला सांगितलं की राजकुमार एवढं तुला सांगतोय तर खरंच मार त्याला आणि मग मी त्या सीनमध्ये राजकुमारच्या खरोखर कानाखाली मारली.”

या चित्रपटात राजकुमार राव व आशुतोष राणा यांच्याबरोबरच भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, पंकज कपूर, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ हा चित्रपट २४ मार्चला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 13:13 IST

संबंधित बातम्या