Ashutosh Rana Spoke About Deepika Padukone’s 8 Hour Shift Demand : दीपिका पादुकोणच्या आठ तास कामाच्या मागणीमुळे गेल्या वर्षी इंडस्ट्रीतील अनेकांमध्ये वाद-विवाद आणि चर्चा झाल्या. अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता लोकप्रिय अभिनेते आशुतोष राणा यांनीसुद्धा याबद्दल त्यांचं मत मांडलं आहे.
आठ तास कामाच्या मागणीमुळे दीपिका पादुकोणनं दोन मोठे प्रोजेक्टही गमावल्याचं म्हटलं जातं. दिवसाला फक्त आठ तास काम करणार ही मागणी केल्यानंतर काहींनी तिच्या समर्थनार्थ मत मांडलं; तर काहींनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच आता आशुतोष राणा यांनीसुद्धा दीपिकाच्या या मागणीचं समर्थन करीत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आशुतोष राणा नेमकं काय म्हणाले?
‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना आशुतोष राणा यांनी आठ तासांच्या कामाच्या तासांमुळे कामही अधिक सर्जनशील पद्धतीनं होतं, असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मला असं वाटतं की, सर्जनशील पद्धतीचं काम आठ तासांपेक्षा अधिक वेळ नाही केलं पाहिजे. आठ तास ही कामाची योग्य वेळ आहे. आठ तासांमध्ये काम पूर्ण होऊ शकतं. जर तुमचं प्री-प्रॉडक्शन खंबीर असेल आणि सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू असतील, गोष्टींबद्दल स्पष्टता असेल, तर तुम्हाला माहुत असतं की, कधी काय करायचं आहे. त्यामुळे आठ तास ही कामाची योग्य वेळ आहे.”
आशुतोष राणा त्याबद्दल पुढे म्हणाले, “जर तुम्ही आठ तासांहून अधिक कालावधी कामाची वेळ ठेवली, तर त्याचा कामाच्या क्वॉलिटीवर परिणाम होतो. त्या कामामध्ये ताकद व ऊर्जा लागते आणि प्रत्येक जण २० तास करू शकत नाही. एखाददुसऱ्या दिवशी कामाची वेळ वाढली, तर ते समजून घेतलं जाऊ शकतं; पण जर ती सवय बनली, तर मग तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की, त्याचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो. मला आठ तास काम ही पद्धत पटते.
दरम्यान, आशुतोष राणा यांच्यासह इंडस्ट्रतील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रातील कामाच्या तासांबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

