scorecardresearch

Premium

“माझी बायको ६ महिन्यांची गरोदर…”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं ‘असं’ उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक

Ask SRK Session : शाहरुख खानने जिंकलं नेटकऱ्यांचं मनं, ‘डंकी’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांच्या प्रश्नांना दिली भन्नाट उत्तरं

shah rukh khan reply to his fan who asked whether his pregnant wife can watch dunki or not
Ask SRK Session : 'डंकी' चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खानने दिली चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. २०२३ मध्ये शाहरुखचे ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे दोन सिनेमे सुपरहिट ठरल्यामुळे राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’कडून किंग खानच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या निमित्ताने शाहरुखने सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यामध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले.

शाहरुखला त्याच्या एका चाहत्याने विचारलं, “माझी बायको ६ महिन्यांची गरोदर आहे तरीही तिला तुमचा चित्रपट पाहायचा आहे…मी काय सांगू आता तिला?” चाहत्याने विचारलेल्या या वैयक्तिक प्रश्नाला सुद्धा किंग खानने एकदम दिलखुलासपणे उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

jaylalita tn
…जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास
Prashan kishor and nitish kumar
“नितीश कुमारांना शिव्या देणारे भाजपा समर्थक आज…”, प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले, “पलटूरामांचे सरदार…”
rajan vichare eknath shinde anand dighe birth anniversary shivsena thane
आनंद दिघे हेच गद्दारांना त्यांची जागा दाखवतील ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका
Yash Chouhan Delhi Murder Case
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या

हेही वाचा : पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर सुरुची अडारकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

किंग खान त्याच्या चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “‘डंकी’ हा चित्रपट लहान मुलं देखील पाहू शकतात. त्यामुळे तू तिला तुझ्याबरोबर घेऊन येऊ शकतोस. फक्त सिनेमागृहात जाताना तिच्यासाठी उशी घेऊन जा…जेणेकरुन ती एकदम आरामात बसून चित्रपट पाहू शकते. तुम्हाला बाळासाठी खूप खूप शुभेच्छा!” शाहरुखचं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : अधिपतीशी लग्न झाल्यावर अक्षराचा ‘असा’ बदलला लूक; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या खऱ्या लग्नात…”

ask srk session
आस्क एसआरके सेशन

दरम्यान, शाहरुख खानचा ‘डंकी’ येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जर ‘जवान’, ‘पठाण’प्रमाणे ‘डंकी’नेही बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींचा गल्ला जमावला, तर यंदाचं वर्ष हे किंग खानसाठी खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरणार आहे. या चित्रपटाची कथा अवैध स्थलांतरावर आधारित आहे. यापूर्वी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’, ‘पीके’, ‘३ इडियट्स’ या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे ‘डंकी’ चित्रपटाकडून शाहरुखच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठ्या अपेक्षा आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ask srk session shah rukh khan reply to his fan who asked whether his pregnant wife can watch dunki or not sva 00

First published on: 07-12-2023 at 08:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×