आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अरशद वारसी होय. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलंय. 'असुर २' या वेब सीरिजमुळे अरशद वारसी सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. सर्वत्र सीरिजची चर्चा असतानाच दुसरीकडे अरशदच्या मुलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अरशदची लेक तिच्या आईबरोबर पोज देताना दिसत आहे. हेही वाचा - निसा देवगणचा कथित बॉयफ्रेंड वेदांत महाजन नक्की आहे तरी कोण? पार्टीतील ‘त्या’ फोटोंमुळे आहे चर्चेत अरशदची पत्नी मारियाने लेक जेनेबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, ते फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोत मारिया इंडियन लूकमध्ये तर जेने इंडोवेस्टर्न कपड्यांमध्ये दिसत आहेत. अरशदची लेक जेने सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यामुळे अभिनेत्याला एवढी मोठी मुलगी आहे, याची कल्पना चाहत्यांना नव्हती. जेनेच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. https://www.instagram.com/p/CaO4yxNl7Ip/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== अरशदने १४ फेब्रुवारी १९९९ रोजी मारिया गोरेटीशी लग्न केलं होतं. या दोघांना जेक आणि जेने नावाची दोन अपत्ये आहेत. अरशद व मारिया मुलांचे फार फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. त्यामुळे मारियाच्या फोटोत जेनेला पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. मारिया व जेने खूप सुंदर दिसत आहेत, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.