scorecardresearch

Athiya Shetty-KL Rahul च्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर; सलमान-शाहरुखसह ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

Athiya Shetty-KL Rahul Wedding Update: अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Athiya Shetty-KL Rahul च्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर; सलमान-शाहरुखसह ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नवीन वर्षातलं बॉलिवूडमधील पहिलं लग्न आज होत आहे. अनेक दिवसांपासून अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलच्या लग्नाची चर्चा होती. अखेर आज दोघंही खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यापैकी काही पाहुण्यांची नावं समोर आली आहेत.

Video: Athiya Shetty-KL Rahul च्या संगीत सोहळ्यात शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकले पाहुणे, पाहा व्हिडीओ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाला सलमान खान, शाहरुख खान आणि एमएस धोनीसह फक्त १०० पाहुणे असतील. इतकंच नाही तर या जोडप्याने त्यांच्या पाहुण्यांसाठी नो-फोन पॉलिसी देखील लागू केली आहे. या लग्नात कुणालाही फोन वापरता येणार नाही.

‘आज की पार्टी मेरी तरफ से’! Athiya Shetty-KL Rahulच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल २३ जानेवारी रोजी सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्नगाठ बांधणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, लग्नात जवळपास १०० पाहुणे असतील. या जोडप्याने नो-फोन पॉलिसी देखील लागू केली आहे. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत सलमान खान, शाहरुख खान, एमएस धोनी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, अक्षय कुमार आणि जॅकी श्रॉफ यांच्यासह इतरांचा समावेश आहे. टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आणि बॉलिवूड फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाही या फार्म हाऊसबाहेर दिसले होते.

दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिलं जाईल, असंही म्हटलं जातंय. अथिया आणि केएल राहुल आज दुपारी ४ वाजता त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 10:24 IST

संबंधित बातम्या