'आदिपुरुष'चा टीझर पाहून प्रेक्षकांनी मानले 'ब्रह्मास्त्र'च्या दिग्दर्शकाचे आभार; म्हणाले "अयान मुखर्जी तुला..."| audience says brahmastra has much better vfx after watching prabhas starrer adipurush teaser | Loksatta

‘आदिपुरुष’चा टीझर पाहून प्रेक्षकांनी मानले ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकाचे आभार; म्हणाले “अयान मुखर्जी तुला…”

गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’बद्दलही अशीच चर्चा रंगली होती.

‘आदिपुरुष’चा टीझर पाहून प्रेक्षकांनी मानले ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकाचे आभार; म्हणाले “अयान मुखर्जी तुला…”
आदिपुरुष वि. ब्रह्मास्त्र | adipurush vs brahmastra

रामजन्मभूमीत म्हणजेच अयोध्या येथे प्रभास आणि क्रीती सनोन यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मिडियावर या चित्रपटाच्या टीझरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स हे कार्टून फिल्मसारखे वाटत असून काही दृश्यं इतर चित्रपटांमधून चोरल्याचे आरोपही प्रेक्षकांनी लावले आहेत.

आता तर प्रेक्षकांनी या चित्रपटातील व्हीएफएक्सची तुलना थेट ‘ब्रह्मास्त्र’शी केली आहे. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’बद्दलही अशीच चर्चा रंगली होती. त्यातील स्पेशल इफेक्टही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नव्हते. चित्रपटाने कमाई जरी चांगली केली असली तरी ‘ब्रह्मास्त्र’वर टीका ही कायम होतच होती.

आणखी वाचा : सैफ अली खानचा ‘रावण’ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर, कुणी तैमूरशी तर कुणी खिलजीशी केली तुलना

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’च्या टीझरने मात्र लोकांचं मत बदललं आहे. ‘आदिपुरुष’पेक्षा ‘ब्रह्मास्त्र’मधील स्पेशल इफेक्ट उत्तम असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोन्ही चित्रपटांचं बजेट जवळपास सारखंच आहे तरी या दोन्ही चित्रपटांच्या स्पेशल इफेक्टमध्ये दिसणारा फरक प्रेक्षकांना जाणवला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज घेऊन त्यांची तुलना करून या दोन्ही चित्रपटातला फरक दाखवला जात आहे. शिवाय “अयान मुखर्जी तुला सलाम” असंही प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ हा अयान मुखर्जीचा पहिलाच प्रयोग होता, तरी त्याचं काम उत्तम असून अजय देवगणबरोबर ‘तान्हाजी’सारख्या चित्रपट देणाऱ्या ओम राऊतकडून ही अपेक्षा नव्हती असं लोकं म्हणत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’मध्येही वानरास्त्र दाखवलं आहे पण ‘आदिपुरुष’मधील वानरसेना ही फार हास्यास्पद आहे असंही लोकांनी म्हंटलं आहे. एकूणच या ‘आदिपुरुष’पेक्षा ‘ब्रह्मास्त्र’ कित्येक पटीने चांगला होता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता ‘आदिपुरुष’ हा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चे विक्रम तोडू शकेल की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“तो गाडीतून उतरून भिकाऱ्यांना…” बॉलिवूड अभिनेत्रीने उलगडला सलमानच्या स्वभावाचा आणखी एक पैलू

संबंधित बातम्या

विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली, “तो मला…”
अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी कियारा जाहीर करणार तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख
विक्रम गोखले यांच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”
“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य
शाहरुख खानच्या ‘मन्नत’बाहेर चक्क आयुष्मान खुरानासाठी गर्दी, वाचा नेमकं काय घडलं?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
निधीअभावी जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले
Fifa World Cup 2022: मेस्सी-रोनाल्डोचे संघ होणार बाहेर? विश्वचषकाचे फसले गणित, जाणून घ्या समीकरण
यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
फेसबुक व्हेरिफाइड बॅज हवा आहे? मग ‘या’ बाबींची पूर्तता करणे गरजेचे, जाणून घ्या प्रक्रिया
“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण