Auron Mein Kahan Dum Tha vs Ulajh collection day 1: अजय देवगण व तब्बू यांचा चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ शुक्रवारी (२ ऑगस्ट) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ‘भोला’, ‘दृश्यम’ या चित्रपटांनंतर पुन्हा एकदा अजय व तब्बू एकाच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे. त्याचबरोबर जान्हवी कपूरचा ‘उलझ’ही शुक्रवारी रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने जास्त कमाई केली, त्यावर नजर टाकुयात.

‘औरों में कहाँ दम था’ पहिल्या दिवसाची कमाई

Auron Mein Kahan Dum Tha box office collection day 1: अजय देवगण व तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला रोमँटिक चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यांच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनकच म्हणायला हवी. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते. पण सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी फक्त २.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Vedaa Vs Khel Khel Mein box office collection
Vedaa Vs Khel Khel Mein: जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Meenakshi Seshadri recalls working with Vinod Khanna
“आम्ही अश्लील विनोद करायचो”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितली विनोद खन्ना यांच्याबरोबरची आठवण; म्हणाली, “माझ्या वडिलांना…”
Laila Majnu Re-Release box office collection
तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Bollywood Movies
‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ की ‘वेदा’, कोणत्या चित्रपटाने अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये मारली बाजी? जाणून घ्या

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

या आठवड्यात इतरही काही बॉलीवूड सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या तुलनेत ‘औरों में कहां दम था’ने थोडी जास्त कमाई केली आहे. पण अजय व तब्बू खूप मोठे स्टार आहेत. तसेच, हा त्यांचा एकत्र १० वा चित्रपट आहे, दोघांच्या चित्रपटांनी अनेकदा बॉक्स ऑफिस गाजवले आहे, त्या तुलनेत या सिनेमाने केलेली कमाई खूप कमी आहे.

‘उलझ’ची पहिल्या दिवसाची कमाई

Ulajh box office collection day 1: इंडस्ट्री सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, जान्हवी कपूर व गुलशन देवैया यांचा ‘उलझ’ पहिल्या दिवशी फक्त १.१० कोटी कमवू शकला. जगभरात या चित्रपटाने दोन कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी ५० कोटींहून जास्त कमाई करावी लागेल. वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होते की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Ulajh box office collection day 1
जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

सुधांशू सारिया दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपटामध्ये जान्हवी कपूरसह गुलशन देवैया व रोशन मॅथ्यू महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती विनीत जैन व जंगली पिक्चर्स यांनी केली आहे. ही कथा एका तरुण आयएफएस अधिकाऱ्याची आहे.