Avneet Kaur Met Tom Cruise : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूझबरोबर दिसत आहे. अवनीतने ‘मिशन : इम्पॉसिबल ८’च्या सेटवर टॉम क्रूझची भेट घेतली असून, तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव तिच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. या फोटोमुळे तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. तर, सोशल मीडियावर तिला अनेक जण शुभेच्छा देत आहेत.

अवनीत कौरची प्रत्येक पोस्ट नेहमीच व्हायरल होते; परंतु टॉम क्रूझबरोबरचा तिचा हा फोटो मीम पेजेससह इतर पेजेसवरही तुफान व्हायरल होत आहे. अवनीतने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिच्या आनंदाचे शब्दांतून वर्णन केले आहे. तिने लिहिले, “मला हे सगळं स्वप्नवत वाटतंय. मी आजही हे सगळं खरं आहे की स्वप्न हे जाणून घेण्यासाठी स्वतःला चिमटा काढून बघत आहे. मला माझ्या स्वप्नातला क्षण खऱ्या आयुष्यात अनुभवण्याची संधी मिळाली. मला ‘मिशन : इम्पॉसिबल’च्या आगामी चित्रपटाच्या सेटवर जायला मिळाले आणि तिथे थेट टॉम क्रूझला भेटण्याची संधी मिळाली. त्याचे धाडसी स्टंट्स पाहून मी स्तब्ध झाले. चित्रपट निर्मितीचा हा अनुभव अविश्वसनीय होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेपर्यंत मी अनुभवलेल्या क्षणांबद्दलचे आणखी काही अपडेट्स शेअर करीन. मी २३ मे २०२५ ची वाट पाहत आहे.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा…Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली

अवनीत कौर ‘मिशन : इम्पॉसिबल ८’मध्ये दिसणार असल्याचा चर्चा

अवनीत कौरने टॉम क्रूझबरोबरचा फोटो शेअर केल्यापासून, ती या सिनेमात दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे अवनीतने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिला ‘मिशन : इम्पॉसिबल ८’च्या सेटला भेट देता आली. टॉम क्रूझचे अ‍ॅक्शन सीन्स बघता आले. मात्र, तिने कॅप्शनच्या शेवटी सिनेमा रिलीज झाल्यावर अधिक अपडेट्स शेअर करीन असे सांगितले आहे. त्यामुळे ती या सिनेमात टॉम क्रूझबरोबर दिसणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याआधी ‘मिशन : इम्पॉसिबल’च्या चौथ्या भागात बॉलीवूडमधील अभिनेते अनिल कपूर यांनी काम केले आहे. त्यामुळे अवनीतही ‘मिशन इम्पॉसिबल’च्या आगामी भागात झळकू शकते, असे म्हटले जात आहे.

अवनीतच्या चाहत्यांसह वरुण धवननेही केली कमेंट

या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘बेबी जॉन’फेम अभिनेता वरुण धवननेदेखील “वा!”, अशी कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “तू भारताच प्रतिनिधीत्व करत आहेस” दुसर्‍या चाहत्याने लिहिले, “ही मुलगी काहीही शक्य करू शकते.”

avneet kaur fans commented on her and tom cruise photo
अवनीत कौरने टॉम क्रूझबरोबर शेअर केलेल्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.(Photo Credit – Avneet Kaur Instagram)

हेही वाचा…अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

अवनीतने हे फोटोज् शेअर करण्याच्या काही मिनिटांआधीच ‘मिशन : इम्पॉसिबल’ मालिकेच्या आठव्या भागाचा टीजर प्रदर्शित झाला. ‘मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग’, असे या चित्रपटाचे शीर्षक असून, हा सिनेमा २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टॉम क्रूझबरोबर हेली अॅटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, वॅनेसा किर्बी, पोम क्लेमेन्टिफ, शिया व्हिगॅम आणि इतर अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Story img Loader