Awarapan 2 Box Office Collection Day 2: इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १४ ऑगस्ट २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला. नितिन कक्कर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विनेश भट्ट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
‘आवारापन २’ या सिनेमात इमरान हाश्मीबरोबर अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दिशा पाटनी, शबाना आझमी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. आता या सिनेमाने दोन दिवसांत किती कमाई केली आहे, याबद्दल जाणून घेऊ…
‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी २२ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आवारापन २ ने दुसऱ्या दिवशी ३३. ७५ कोटींची कमाई केली. दोन दिवसांत सिनेमाने भारतात ५५. ७५ कोटींची निव्वळ कमाई केली. तर सिनेमाची एकूण कमाई ६६.९० कोटी इतकी आहे.
जगभरात या सिनेमाने ७२.९० कोटींची कमाई केली आहे. आता आगामी काळात या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हा सिनेमा नवीन रेकॉर्ड तयार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘आवारापन २’ हा ‘आवारापन’चा सिक्वेल आहे. २००७ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन मोहित सुरींनी केले होते. या सिनेमातही इमरान हाश्मीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसला होता. या सिनेमात श्रिया सरन, मुकेश भट्ट, आशुतोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. आवारानपनचे बजेट १८ कोटी इतके होते. तर सिनेमाने १२ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता आवारापन २ ने पहिल्याच दिवशी आवारपनच्या एकूण कमाईला मागे टाकले आहे.
इमरान हाश्मीच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेता गेल्या काही काळापासून विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्राउंड झिरो, जी २, हक, दे कॉल हिम ओजी अशा अनेक सिनेमांतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या सिनेमांतील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. तसेच, त्याची प्रत्येक भूमिका ही इतर भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, आता आगामी काळात तो कोणत्या सिनेमात दिसणार, कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
