Emraan Hashmi returns as Shivam in Awarapan 2. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘सीरिअल किसर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘आवारापन’ चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘आवारापन २’ (Awarapan 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष भट्ट, इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विशेष भट्ट आणि इमरान हाश्मी ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार असून, नितीन कक्कड यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
तब्बल १९ वर्षांनी इमरान हाश्मीच्या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येतोय. अखेर बहुप्रतिक्षित ‘आवारापन २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट निर्माते विशेष भट्ट आणि अभिनेता इमरान हाश्मी प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
आज विशेष भट्ट, इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आवारापन २’ ची एक छोटीशी झलक चाहत्यांना दाखवली. या पोस्टद्वारे त्यांनी १४ ऑगस्ट २०२६ ला हा चित्रपट रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं.
‘आवारपन’बद्दल निर्माते विशेष भट्ट म्हणाले, “आवारापन हा सिनेमा नाही, तर एक भावना आहे, जी फक्त मोठ्या पडद्यासाठीच बनली आहे. यामध्ये परदेशातील सुंदर लोकेशन्स आणि सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. या चित्रपटात दमदार पात्रे, दर्जेदार संगीत आणि उत्तम कथानकावर आधारित आहे. इमरानने ‘शिवम’ या पात्रातील वेदना उत्तम पद्धतीने पडद्यावर जिवंत केल्या आहेत. तो त्या भूमिकेत शिरला होता. आणि आता दिशा पाटनी आमच्याबरोबर या चित्रपटात जोडली गेली आहे, त्यामुळे हा चित्रपट आणखी खास ठरणार आहे.”
या चित्रपटाच्या निमित्तानं दिशा पाटनी पहिल्यांदाच ‘विशेष फिल्म्स’बरोबर काम करतेय. दिशाने यापूर्वी ‘मलंग’, ‘बागी २’, ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘कल्की २८९८-एडी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
‘आवारपन २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केलं असून लेखन बिलाल सिद्दीकी यांनी केलं आहे. विशेष भट्ट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा टप्पा मुंबईत सुरू आहे. ‘आवारापन २’ १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
