Ayesha Jhulka on Nana Patekar and Akshay Kumar: नाना पाटेकरांचा १९९४ ला प्रदर्शित झालेला क्रांतिवीर हा सिनेमा आठवतोय? हा सिनेमा जितका गाजला तितकेच सिनेमातील डायलॉगही मोठ्या प्रमाणात गाजले. त्यांचा “आ गए मेरी मौत का तमशा देखने” हा डायलॉग असो किंवा “एक मच्छर साला…” हा डॉयलॉग असो. याबरोबरच २००७ ला प्रदर्शित झालेल्या वेलकम सिनेमातील डायलॉगही लोकप्रिय ठरले. आजही नाना पाटेकर त्यांच्या विविध भूमिका आणि डायलॉगमुळे सतत चर्चेत असतात. याबरोबरच ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे, त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.
अभिनेत्री आयेशा जुल्काचे नाव नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर जोडले गेले होते. अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या नात्यांबद्दल तसेच नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्यामध्ये तिच्यामुळे दुरावा आलेला का, याबद्दल वक्तव्य केले होते.
अभिनेत्रीने विकी लालवाणीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती म्हणालेली, “तुम्ही त्यावेळची मासिके उघडली तर सगळ्यांबरोबर माझे नाव जोडलेले होते. पण, ज्यांच्याबरोबर माझे नाव जोडले होते, त्या सगळ्यांबरोबर माझे मैत्रीचे नाते होते. जेव्हा तुम्ही सहा-सात चित्रपट एकत्र करता, त्यावेळी दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही एकमेकांना भेटता. त्यावेळी तर मैत्रिणींपेक्षा जास्त मित्र होते. पण, याचा अर्थ असा नाही मी त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यात लपवण्यासारखे काय आहे.”
“मनीषा कोईराला व नाना पाटेकरांच्या रिलेशनशिपशी…”
असे म्हटले जायचे की, आयेशा नाना पाटेकरांबरोबर रिलेशनशिपमध्ये होती, त्यामुळे मनीषा कोईराला व नाना पाटेकरांमध्ये दुरावा निर्माण झाला. मनीषा कोईराला यांनी नाना पाटेकरांबरोबर ब्रेकअप केले. यावर आयेशा जुल्का म्हणालेली, “माझं त्यांच्या रिलेशनशिपबरोबर काहीच देणं घेणं नव्हतं. आम्ही एकत्र फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही एका नाटकातही एकत्र काम केलं. पण, ते माझे सीनिअर होते. माझ्या वयाच्या कलाकारांबरोबर माझं नाव जोडलं जाणं हे मी समजू शकते, पण जेव्हा माझ्यापेक्षा मोठ्या कलाकारांबरोबर माझे नाव जोडले जाते, तेव्हा ते मला आवडत नाही, त्यामुळे मनीषा कोईराला व नाना पाटेकरांच्या रिलेशनशिपशी माझा काही संबंध नव्हता.”
अक्षय कुमारबद्दल अभिनेत्री काय म्हणालेली?
आयेशाचे नाव अक्षय कुमारशीदेखील जोडले गेले होते. १९९२ ला प्रदर्शित झालेल्या खिलाडी सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर अभिनेत्री म्हणाली, “आमच्यात कदाचित आकर्षण होते, पण ती सामान्य गोष्ट होती. आम्हाला एकमेकांचे कौतुक होते, आम्हाला एकमेकांची ओढ वाटली, पण त्याला शारीरिक आकर्षण म्हणणे योग्य आहे, असे मला वाटत नाही.”
दरम्यान, आयेशा जुल्काने जो जिता वही सिंकदर, कैसे कैसे रिश्ते, संग्राम, वक्त हमारा है, दिल की बाजी, दुश्मन अशा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
