‘साजन’ चित्रपट हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. १९९१ साली आलेल्या या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या चित्रपटासाठी खरं तर माधुरी दीक्षित पहिली पसंती नव्हती. पण माधुरीला हा चित्रपट योगायोगाने मिळाला.

माधुरीआधी दिग्दर्शक आधी लॉरेन्स डिसूझाने ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्काला या चित्रपटासाठी साइन केलं होतं. आयशा त्या काळात ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’ आणि ‘हिम्मतवाला’ सारख्या यशस्वी चित्रपटांमुळे चर्चेत होती. आयशानेही चित्रपट साइन केला आणि शूटिंग सेटवर पोहोचली होती.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, आयशा जुल्काने ‘साजन’च्या शूटिंगला सुरुवात केली होती पण सेटवरच तिची तब्येत बिघडली. आयशाला खूप ताप आला आणि तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला चित्रपटाचे शूटिंग चालू ठेवणं शक्य नव्हतं. आयशाची तब्येत पाहून निर्मात्यांनी मुख्य भूमिकेसाठी माधुरी दीक्षितशी संपर्क साधला. चित्रपट सुपरहिट ठरला आणि माधुरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

सानिया मिर्झा-शोएब मलिकच्या कथित घटस्फोटास जबाबदार धरल्यानंतर आयशा ओमरचं भारताबद्दल वक्तव्य, म्हणाली “तिच्याच देशातील…”

खरं तर या चित्रपटात संजय दत्त व आयशा जुल्का ही जोडी दिसणार होती. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार आमिरला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि तो या पात्राशी रिलेट होऊ शकला नाही म्हणून त्याने चित्रपट सोडला आणि त्याच्या जागी संजय दत्तला ऑफर देण्यात आली होती. अशा रितीने दोन कलाकारांनी चित्रपट नाकारल्यानंतर माधुरी व संजयने हा चित्रपट केला होता.