आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आयुष्मान खुरानाने साकारलेली ‘पूजा’ची व्यक्तिरेखा खूप गाजली. आता आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘ड्रीम गर्ल २’ची घोषणा केली. तर तो वेळोवेळी या चित्रपटाबद्दलचे अपडेट्सच्या त्यांची शेअर करत होता. प्रेक्षकही या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता अशा तस निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुष्मान खुरानच्या या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचे टीचर्स सध्या प्रदर्शित होत आहेत. यातील एका टीझरमध्ये पूजा रणबीर कपूरशी, दुसऱ्या टीझरमध्ये शाहरुख खानशी आणि तिसऱ्या टीझरमध्ये सलमान खानशी बोलताना दिसली. हा चित्रपट ७ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयुष्मान खुरानाने आज सोशल मीडियावर एक पोस्ट करत या चित्रपटाची बदललेली तारीख चाहत्यांची शेअर केली. “चार वर्षांनी पूजा तुमच्या भेटीला येणार असल्याने त्याची तयारी सुद्धा तितकीच धमाकेदार व्हायला हवी. त्यामुळे आता पूजा २५ ऑगस्टला तुमच्या भेटीला येईल,” असं आयुष्यमानने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : आयुष्मान खुरानाच्या करिअरवर कमाल आर खानने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाला, “आता सिद्ध झालं की…”

त्यामुळे आता हा चित्रपट ७ जुलैच्या ऐवजी २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.