scorecardresearch

Premium

सासरेबुवा जेव्हा जावयाच्या खांद्यावर हात ठेवून पोज देतात; अमिताभ बच्चन व निखिल नंदा यांचे फोटो व्हायरल

अगस्तसाठी एकत्र जमले बच्चन व नंदा कुटुंबीय, खास फोटो पाहिलेत का?

Amitabh Bachchan son in law nikhil nanda photo viral
बच्चन व नंदा कुटुंबाचे फोटो (फोटो क्रेडिट – वरिंदर चावला इन्स्टाग्राम)

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा ‘द आर्चीज’मधून चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. मंगळवारी मुंबईत या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अगस्त्यसाठी संपूर्ण बच्चन आणि नंदा कुटुंब एकत्र आले. फोटोग्राफर्सनी पोज द्यायला सांगितल्याने जया बच्चन थोड्या नाराज झाल्या. पण नंतर मात्र त्यांनी कुटुंबियांबरोबर पोज दिली.

जया बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, श्वेता नंदा, निखिल नंदा, नव्या नवेली नंदा आणि बच्चन-नंदा कुटुंबातील इतर सदस्य अगस्त्यच्या या खास दिवसासाठी एक कुटुंब एकत्र आले होते. यावेळी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांनीही अगस्त्यबरोबर स्वतंत्रपणे पोज दिल्या. खरं तर बच्चन व नंदा कुटुंबाने एकत्र दिलेल्या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आपल्या जावयाच्या खांद्यावर हात ठेवून पोज देतात. बऱ्याच काळानंतर दोन्ही कुटुंबाचा एकत्र फोटो चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. सासरे बिग बी व जावई निखिल यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

11 year old boy created a mosaic art of Shree Ram
Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Rohit Pawar ED
रोहित पवारांची ११ तासांनंतर ईडी चौकशी संपली; कार्यालयाबाहेर येताच म्हणाले, “जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो…”
students
विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर आता लाल किंवा हिरव्या रंगाचा ठिपका, शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

‘द आर्चीज’ या पदार्पणाच्या चित्रपटात अगस्त्य आर्ची अँड्रयूजची भूमिका साकारत आहे. “या चित्रपटासाठी मी गिटार शिकलो, मला गाणं शिकावं लागलं. मी दोन्ही गोष्टी शिकलो आणि हा एक उत्तम अनुभव होता,” असं अगस्त्य ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना म्हणाला होता.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

दरम्यान, ‘द आर्चीज’बद्दल बोलायचं झाल्यास अगस्त्यबरोबरच सुहाना खान आणि खुशी कपूरही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यावेळी सुहानाला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख आणि संपूर्ण खान कुटुंब तिथे हजर होते आणि बहीण खुशीला सपोर्ट करण्यासाठी जान्हवी कपूर हजर होती. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला असून तो ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachchan and nanda family at the archies premiere for agastya amitabh bachchan son in law nikhil nanda photo viral hrc

First published on: 06-12-2023 at 09:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×