Aryan Khan Networth : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमुळे चर्चेत होता. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार झळकले. आर्यनने यामधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, अजून एकाही चित्रपटात काम न केलेल्या आर्यनची नेटवर्थ किती आहे?
आर्यन खानचा जन्म १२ नोव्हेंबर १९९७ मध्ये झाला होता. आज आर्यन त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार आर्यनने धीरूभाई अंबानी इंटरनॅश्नल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. यानंतर आर्यनने साऊथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्टसमधून सिनेमा आणि टेलिव्हिजन मेकिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे.
आर्यन खानची नेटवर्थ किती?
आर्यनने त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला नाही, तर ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. तर तो एक यशस्वी उद्योजकही आहे. Timesnownews.com च्या वृत्तानुसार आर्यन खानची नेटवर्थ ८० कोटी इतकी आहे.
शाहरुख खानचा मुलगा फक्त दिग्दर्शक नाही तर उद्योजकही आहे. २०२२ मध्ये त्याने त्याच्या लक्झरी ब्रँडची सुरुवात केली. त्याने D’YAVOL या ब्रँडला को लाँच केलं. आर्यनने लाँच केलेल्या ब्रँडमधील जॅकेटची किंमत २ लाख रुपये इतकी, तर टी-शर्टची किंमत २४,४०० रुपये इतकी आणि हुड्डीची किंमत ४५,५०० रुपये इतकी आहे. यावरून अंदाज लावता येऊ शकतो की त्याचा ब्रँड किती मोठा आहे.
आर्यन खानकडे याव्यतिरिक्त ऑडी A6, BMW 730 LD, मर्सिडीज GLS 350D आणि स्पोर्टी GLE 43 AMG कुपेसारख्या महागड्या गाड्या आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का अजून एकाही चित्रपटात काम न केलेल्या आर्यन खानची नेटवर्थ जवळपास जान्हवी कपूर एवढी असून अनन्या पांडेपेक्षाही अधिक आहे.
जान्हवी कपूरची नेटवर्थ किती?
जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केलं. Koimoiच्या वृत्तानुसार जान्हवीची नेटवर्थ ८२ कोटी इतकी आहे. तर तिच्याकडेही BMW एक्स ५, मर्सिडीज GLA यांसारख्या आलिशान गाड्या आहेत.
अनन्या पांडेची नेटवर्थ किती?
अनन्या पांडेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. तिचा तिथे माठा चाहतावर्ग आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार अनन्याची नेटवर्थ ही जवळपास ७५ कोटी इतकी आहे.
