Badshah on Ramayana Movie: ‘रामायण’ या सिनेमाबद्दल अनेकजण बोलत आहेत. त्यांना हा सिनेमा कसा वाटला याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत. आता लोकप्रिय गायक बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत रामायण सिनेमाबद्दल त्याचे मत सांगितले आहे.
“कलाकार त्यांच्या भूमिकेबरोबर…”
बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीबाबत बोलायचे आहे. मी काल रामायण हा सिनेमा पाहिला.”
पुढे तो सिनेमाबद्दल म्हणाला, “सिनेमातील असा कोणता सीन आहे, जेव्हा अंगावर काटे येत नाहीत. असा कोणता सीन आहे, ज्याचे तुम्ही कौतुक करणार नाही. आपण अभिनय म्हणू शकत नाही. कलाकार त्यांच्या भूमिकेबरोबर एकरूप झाले आहेत. मग प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारा रणबीर कपूर असो किंवा सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी, लक्ष्मणची भूमिका साकारणारा रवी दुबे असो. रावणाची भूमिका साकारणारा यश, प्रत्येक कलाकाराने त्याची भूमिका चोख निभावली आहे.”
तो असेही म्हणाला, “मला पाप लागेल कारण मी सुरुवातीला रावणाची एन्ट्री मला बघता आली नाही. सिनेमाची प्रत्येक फ्रेम सुंदर आहे. नमित मल्होत्रा, नितेश तिवारी तुम्हा दोघांचेही खूप आभार. तुम्ही तुमच्या शब्दांची, या कथेची तसेच भारतीय सिनेमाचा मान राखला.”
बादशाहने बँकग्राउंड म्युझिकचेही कौतुक केले. तसेच त्याने सिनेमाला रेटिंगही दिले. मी या सिनेमाला पाचपैकी सहा गुण देतो, असे म्हणत बादशाहने रामायणचे कौतुक केले.
दरम्यान, फक्त बादशाहानेच नाही तर, करण जोहर, अनुपम खेर अशा अनेक कलाकारांनी सिनेमाचे कौतुक केले आहे.
