सलमान खानच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेकांनी सलमानच्या ३५ वर्षांच्या करिअरमधील सर्वांत चांगला चित्रपट म्हणून या सिनेमाचे कौतुक केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. तसेच या ‘बजरंगी भाईजान’ची कथा सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. शूटिंगदरम्यान या चित्रपटामधील क्लायमॅक्सबाबत एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता.

हेही वाचा : “चिंता, काळजी आणि ट्रोल…” बाईक राईडच्या फोटोवर अमिताभ बच्चन यांचे स्पष्टीकरण

Sourav Ganguly's Reaction to Rohit's Leadership
Sourav Ganguly : “…म्हणून मी रोहित शर्माला कर्णधार बनवलं होतं”, सौरव गांगुलीचा ‘हिटमॅन’बद्दल मोठा खुलासा
shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत एस. एस. राजामौली यांनी काही सूचना दिल्या होत्या. ‘बजरंगी भाईजान’च्या क्लायमॅक्समध्ये शेवटी पत्रकार चांद नवाब (नवाजुद्दीन सिद्दिकी), मुन्नीला (हर्षाली मल्होत्रा) घरी सोडायला जातो, असे दाखवण्यात आले आहे. याऐवजी पवनने (सलमान खान) मुन्नीला घरी सोडले पाहिजे होते. याविषयी एका मुलाखतीदरम्यान सलमान खान म्हणाला होता की, “केवळ एस. एस. राजामौलीच नाही तर मला सुद्धा हाच क्लायमॅक्स अपेक्षित होता.”

हेही वाचा : कान्सच्या रेड कार्पेटवर नवरीसारखी सजली ‘सारा’, नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “भारतीय पोशाखापेक्षा…”

याबाबत राजामौली यांनी आपल्या वडिलांनाही सांगितले होते. मुन्नीला आपल्या स्वगृही सोडण्यासाठी पवन पाकिस्तानात जातो परंतु पोलिसांनी आधीच अटक केल्यामुळे चांद नवाब मुन्नीला तिच्या आईशी भेट करून देतो. अगदी सलमान खानला सुद्धा तो स्वत: मुन्नीला तिच्या आईकडे देतो आणि त्यानंतर पोलीस अटक करतात, असा क्लायमॅक्स पाहिजे होता. परंतु काही कारणास्तव यात बदल करण्यात आला नाही.

दरम्यान, सलमानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. लवकरच सलमान त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘टायगर-३’ मध्ये कतरिना कैफबरोबर झळकणार आहे.