Aaishvary Thackeray : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे व स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे बॉलीवूड पदार्पणासाठी तयार आहे. तो अनुराग कश्यपच्या चित्रपटातून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवणार आहे. त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची असली तर ऐश्वर्यला मात्र राजकारणात जायचं नाही. त्याला सिनेविश्वात काम करायचं आहे. ऐश्वर्य ठाकरे चित्रपट निर्माता अनुराग कश्यपबरोबर काम करून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ऐश्वर्य व अनुराग कश्यप यांच्या या आगामी प्रकल्पाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “प्रत्येक मीटिंगमध्ये अनुराग व ऐश्वर्य यांचा चित्रपट हा चर्चेचा मुख्य विषय असतो. हा चित्रपट इंडस्ट्रीतील प्रोडक्शन हाऊसमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला प्रोजेक्ट आहे.”

१० वर्षांपूर्वी केलं संजय लीला भन्साळींबरोबर काम

ऐश्वर्यने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात काम करताना तो दिग्दर्शनातील बारकावे व त्याचबरोबर अभिनयही शिकला.

ऐश्वर्यला डान्सची आहे आवड

अभिनयात पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला ऐश्वर्य उत्तम डान्सर आहे. तो मायकल जॅक्सनला प्रेरणास्थान मानतो, असं म्हटलं जातं. ऐश्वर्य लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. पहिलाच प्रोजेक्ट त्याला अनुराग कश्यपबरोबर मिळाला आहे, त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. राजकारणाऐवजी अभिनयक्षेत्र निवडणारा ऐश्वर्य आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतो की नाही, ते येत्या काळातच कळेल.

उद्धव ठाकरेंचा पुतण्या आहे ऐश्वर्य

ऐश्वर्य ठाकरे हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे. तसेच तो आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांचा चुलत भाऊ आहे. ऐश्वर्य सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचे अनेक फोटो आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray grandson aaishvary thackeray bollywood debut with anurag kashyap hrc