Before Amitabh Bachchan Rekha was madly in love with this actor: रेखा या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्या चित्रपटांत दिसत नसल्या तरी त्या विविध कार्यक्रमांना हजर असतात. त्यांची उपस्थिती, त्यांचा पेहराव लक्ष वेधून घेतात. अनेकदा त्या पापाराझींबरोबर मजेशीरपणे संवाद साधतात. त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी बऱ्याचदा रेखा व जया बच्चन यांची एकमेकांशी तुलना करतात.

रेखा कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात होत्या?

रेखा व जया बच्चन यांच्यात तुलना होण्याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन आहेत. अमिताभ बच्चन व रेखा एकमेकांच्या प्रेमात होते, अशा स्वरूपाच्या अनेकविध चर्चा झाल्या होत्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचे लग्न जया बच्चन यांच्याशी झाले. आजही अनेक कलाकार त्यावर बोलताना दिसतात. रेखाही अनेकदा बिग बींबद्दल आदर व्यक्त करतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडण्यापूर्वी रेखा कोणत्या अभिनेत्याच्या प्रेमात होत्या?

रेखा व अभिनेते किरण कुमार एकमेकांच्या प्रेमात होते. ते रिलेशनशिपमध्ये होते. एका फोटोग्राफरने त्यांचा फोटो काढला. तो फोटो वर्तमानपत्रात छापला. त्या फोटोत दोघेही हातात हात घेऊन गडबडीत निघत असल्याचे दिसत होते.

१९७५ ला रेखा यांनी स्टारडस्ट मॅगझिनला मुलाखत दिली होती. किरण यांची अशी कोणती सवय आहे, जी तिला खटकते, असे विचारले होते. त्यावर रेखा यांनी खुलेपणाने उत्तर दिले होते. त्या म्हणालेल्या, “आम्ही कधीच रात्री उशिरा बाहेर जाऊ शकत नाही. कारण- त्याला रात्री बरोबर १० वाजता घरी पोहोचून ग्लासभर दूध पिऊन झोपायचे असते.”

जेव्हा किरण यांना हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणालेले, “जेव्हा रेखा फोन एक्स-गर्लफ्रेंडच्या आवाजाची नक्कल करते, तेव्हा मला त्याचा त्रास होतो.”

रिपोर्टसनुसार, किरण यांचे वडील जीवन ज्यांनी ५० च्या दशकात खलनायकाच्या भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचा रेखा व किरण यांच्या नात्याला नकार होता. रेखा यांच्या भूतकाळामुळे त्यांनी मुलगा किरण व रेखा यांच्या नात्याला मान्यता दिली नाही. दुर्दैवाने किरण व रेखा यांना त्यांच्या नात्याला पूर्णविराम द्यावा लागला.

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत किरण यांनी रेखा यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. ती खूप प्रेमळ व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते म्हणालेले, “आजही रेखा जशी दिसते, तिचे ते सौंदर्य वर्षानुवर्षे तसेच आहे. ते तिने कसे सांभाळले आहे, याचे मला आश्चर्य वाटते. मला तिच्याबद्दल आदर आहे. आमची बऱ्याच काळापासून भेट झाली नाही; पण ती अशी व्यक्ती आहे, जिला मी माझ्या हृदयात जपून ठेवेन.”