Bhagyashree Bhojpuri Song with Manoj Tiwari : बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीने ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातून जबरदस्त लोकप्रियता मिळवली. सलमान खानबरोबर तिच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर भाग्यश्री अगदी काही सिनेमांमध्येच ती झळकली. मात्र, आजही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. बॉलीवूड गाजवलेल्या भाग्यश्रीनं भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. लोकप्रिय गायक मनोज तिवारी यांच्या रोमँटिक भोजपुरी गाण्यामध्ये भाग्यश्री झळकली होती.

भाग्यश्रीनं जवळपास २९ वर्षांपूर्वी भोजपूरी गाण्यामध्ये काम केलं होतं. आजही भोजपुरी प्रेक्षक तिचं हे गाणं आवडीनं ऐकतात. भाग्यश्रीनं मनोज तिवारीबरोबर २००७ मध्ये देवा या भोजपुरी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील ‘गोरिया चाँद के अंजोरिया…’ या गाण्यात ती झळकली होती. त्यामध्ये भाग्यश्री व मनोज तिवारी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या रोमँटिक गाण्यामध्ये मनोज तिवारी हे मैत्रिणीच्या सौंदर्याची प्रशंसा करीत असल्याचं दाखविण्यात आलं होतं.

मनोज तिवारी व भाग्यश्रीचे रोमँटिक गाणे

भाग्यश्रीने २००७ मध्ये मनोज तिवारी यांच्यासोबत ‘देवा’ या भोजपुरी सिनेमात काम केलं होतं. याच सिनेमात भाग्यश्री आणि मनोज तिवारी यांच्यावर ‘गोरिया चाँद के अंजोरिया…’ हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. हे एक रोमँटिक गाणं असून, त्यामध्ये मनोज तिवारी आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसतात.

अभिनेत्री भाग्यश्री
भाग्यश्री

मनोज तिवारी यांच्या आवाजातील ‘गोरिया चाँद के अंजोरिया…’ हे गाणं रिलीज झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. प्रेक्षकांनी या गाण्याला भरभरून प्रेम दिलं होतं. यूट्यूबवर या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. टी-सीरिज हमार भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर या गाण्याला ४० दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणं स्वतः अभिनेते व गायक मनोज तिवारी यांनी गायलं आहे; तर लाल सिन्हा यांनी त्या गाण्याला संगीत दिलं आहे. शबीर अहमद यांनी हे गीत लिहिले आहे. दरम्यान, भाग्यश्री ही पुन्हा एकदा सिनेविश्वामध्ये सक्रिय झाली आहे.

भोजपुरी गाण्यात भाग्यश्री

काही महिन्यांपूर्वी ती रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या राजा शिवाजी या सिनेमामध्ये झळकली होती. त्यामध्ये भाग्यश्रीने राजमाता जिजाऊ यांची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेली भाग्यश्री तिचे अपडेट शेअर करीत असते.