Bhagyashree On Diet And Fitness: भाग्यश्री ही बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘मैंने प्या किया’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून ती सामान्यांना दैनंदीन आयुष्यात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी सांगते. अनेकदा ती विविध पदार्थांच्या रेसिपी सांगते. तर अनेकदा ती लोकांना निरोगी राहण्यासाठीदेखील अनेक उपाययोजना सांगते.

भाग्यश्री म्हणाली…

आता भाग्यश्री तंदुरुस्त राहण्यासाठी नेमकं काय करते, हे जाणून घेऊ. तिने एकदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते, “तुमचे वय किती आहे किंवा तुमचे वेळापत्रक कसे आहे याचा फरक पडत नाही. जर तुम्ही दिवसातील ३०-४० मिनिटे व्यायामासाठी दिलीत,तर खूप मोठा फरक तुम्हाला दिसू शकतो.”

Award Banner

“व्यायाम करताना सातत्य महत्वाचे आहे. पार्टीला गेल्यानंतर तुम्हाला डाएट मोडावे असे वाटू शकते. पण, या सगळ्यात सातत्य ठेवणे, महत्वाचे आहे. नियमित व्यायाम केला तर तुम्ही तुमच्या फिटनेसच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता”, असे भाग्यश्रीने एका व्हिडीओमध्ये म्हणले होते.

भाग्यश्रीच्या मतानुसार, व्यायाम करताना डाएटवर लक्ष देणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. भाग्यश्री म्हणालेली, “तुमच्या शरीराच्या नेमक्या गरजा काय आहेत? त्यावर लक्ष द्या. डोळ्यांखाली किंवा पायाची त्वचा ओढल्यासारखी होत असेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. यासाठी बदाम, सूर्यफूलाच्या बियाणे किंवा पालक याचा डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. जर सतत मूड स्विंग आणि चिडचिड होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बीची कमतरता असू शकते. त्यासाठी राजमा, चणे, शेंगदाणे खाता येतात. तसेच, दररोज सूर्यप्रकाशात गेले पाहिजे.

योग्य व्यायाम आणि संतुलित आहार हेच निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे असल्याचे भाग्यश्रीच्या फिटनेसचे रहस्य आहे. भाग्यश्री ५६ वर्षांची आहे. मात्र आजही ती फिट दिसते. तिच्या सौंदर्याची भुरळ आजही चाहत्यांवर पडते.

दरम्यान, भाग्यश्री विविध लूकमधील तिचे फोटोदेखील शेअर करते. ती जेव्हा विविध ठिकाणांना भेटी देते, त्यावेळी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.