Bhooth Bangla Teaser: बॉलीवूडचा खिलाडी कुमार लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूत बंगला असे या सिनेमाचे नाव आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.
‘भूत बंगला’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
निर्मात्यांनी गुरुवारी (१२ मार्च २०२६ ला) भूत बंगला सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच, परेश रावल, राजपाल यादव, दिवगंत अभिनेत असरानी, तब्बू, वामिका गब्बी, मनोज जोशी, मिथिला पालकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक हवेली दिसते. असरानी यांचा आवाज येतो. ते म्हणतात, “मालक मंगलपूरमध्ये कोणी लग्न करू शकत नाही. नाहीतर वधुसुर येईल.” याच दरम्यान भीती वाटेल असे आवाज ऐकायला मिळतात. तसेच, झाडाच्या फांदीला कोणीतरी पकडत असल्याचे दिसते.”
टीझरमध्ये पुढे पाहायला मिळते परेश रावल, राजपाल यादव, अक्षय कुमार यांची पात्रे पाहायला मिळतात. सर्वजण वधुसुरबद्दल बोलत असल्याचे दिसते. त्यानंतर त्या मोठ्या हवेलीमध्ये अक्षय कुमार आल्याचे पाहायला मिळते. तो कोणालातरी फोनवर सांगतो की मला मोठा बंगला मिळाला आहे. त्यानंतर अनेक चित्रविचित्र घटना घडताना दिसतात. चित्रपटातील पात्रे मोठमोठ्याने हसतात, रडतात आणि ओरडतानादेखील दिसतात.
एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चरचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट अनेकदृष्टींनी महत्वाचा आहे. कारण प्रियदर्शन व अक्षय कुमार १६ वर्षानंतर एकत्रव काम करत आहेत. २०१० मध्ये त्यांनी खट्टा मीठा या चित्रपटात एकत्र काम केले होते. या जोडीचे अनेक चित्रपट गाजले आहेत. यामध्ये गरम मसाला, भागम भाग, दे दना दन असे अनेक चित्रपटांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
विशेष म्हणजे हेरा फेरी ३ चित्रपटाची जेव्हा घोषणा झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नसल्याचे घोषित केले होते. त्यानंतर अक्षयने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. काही काळाच्या वादानंतर परेश रावल यांनी चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले. आता या वादानंतर अक्षय व परेश रावल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
याबरोबरच असरानी यांच्या मृत्यूनंतर त्यांची महत्वाची भूमिका असलेला भूत बंगला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २० ऑक्टोबर २०२५ ला ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तसेच, गेल्या काही दिवसांपासून राजपाल यादव चेक बाऊन्स केसमुळे चर्चेत आहे. तोदेखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अनेक अर्थांनी हा सिनेमा महत्वपूर्ण आहे.
प्रियदर्शनदेखील तीन वर्षानंतर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात परतले आहेत. याआधी २०२३ मध्ये त्यांनी एका तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता हा सिनेमा १० एप्रिल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
