Bhumi Pednekar on Ozempic rumours: अनेकांसाठी वाढलेले वजन ही त्यांची सर्वात मोठी समस्या असते. अनियमित जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.
विविध क्षेत्रातील विविध कामाच्या वेळा यामुळे त्याचा जीवनशैलीवर परिणाम होतो. तसेच, अलीकडे जंक फूड खाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याबरोबरच कमी प्रमाणात पाणी पिण्याचादेखील शरीरावर परिणाम होत असतो. अशा अनेक गोष्टींमुळे अनेक आजार बळावतात. तसेच अनेकांना वजन कमी होणे, वजन वाढणे यासारख्या समस्यांचा सामानादेखील करावा लागतो.
बॉलीवूडमधील अनेक कलाकार त्यांनी कसे वजन कमी केले याबद्दल खुलासा करतात. अनेकदा नेटकरी कलाकारांनी ओझेम्पिकसारखी औषधे घेऊन वजन कमी केल्याचे म्हणतात.
आता भूमी पेडणेकरने तिने कसे वजन कमी केले आणि औषधांच्या मदतीने वजन कमी करणाऱ्यांबद्दल तिचे मत काय आहे, हे सांगितले आहे. भूमी पेडणेकरणे नुकतीच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती.
“जेव्हा मी खूप व्यायाम…”
यावेळी तिने तिची फिटनेस जर्नी सांगितली. ती म्हणाली की मला जीममध्ये व्यायाम करणे आवडायचे नाही. अक्षय सरांनी (अक्षय कुमार) स्ट्रेंथ ट्रेनिंगची ओळख करून दिली. माझ्या आयुष्यात असाही काळ आला जेव्हा मी खूप व्यायाम करायचे. त्याला कोणतेही बंधन नव्हते. त्यादरम्यान मी आजारी पडले होते. त्यानंतर मी माझ्या जीवनशैलीत खूप बदल केला.
भूमी असेही म्हणाली की मी गेल्या दहा वर्षात मी माझी जीवनशैली बदलली आहे. आता मी खाणे आणि व्यायाम याकडे व्यवस्थित लक्ष देते. योग्य प्रमाणात या गोष्टी करते. हे खूप महत्वाचे आहे. आता मी फक्त ४०-४५ मिनिटे व्यायाम करते. आधी मी २ ते ३ तास व्यायाम करायचे. कोव्हिडच्या काळात तर वेड्यासारखा व्यायाम करायचे.
भूमीने असेही सांगितले की ती दोन वेळा जेवण करते. इतरवेळी ती काहीही खात नाही. तसेच ती मांसाहर कमी करते, ती शाकाहारी आहे. तसेच तिच्या आहारात दूधाचे प्रमाणदेखील कमी असते.
भूमीने असेही म्हणाली की एका पात्रासाठी मी खूप वजन कमी केले होते. मी दवाखान्यात होते. कारण- मला डेंग्यू झाला होता. त्यावेळी १२ किलो वजन कमी झाले होते. माझे अर्धे केस गळाले होते. त्या वेदना असह्य होत्या. त्यावेळी लोक मला विचारायचे की मी ओझेम्पिकसारखी औषधे घेऊन वजन कमी केले आहे. पण मी वजन कमी करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली आहे. योग्य प्रकारे खात आहे. योग्य प्रमाणात व्यायाम करते, परिणामी माझे वजन कमी झाले आहे.
ती असेही म्हणाली, “मला असेही लोक माहित आहेत की जे औषधे घेऊन वजन कमी करत आहे. पण, त्यांना त्याची गरज आहे. मी कोणालाही जज करत नाही. प्रत्येकाची एक जगण्याची पद्धत असते. पण हे खरे आहे की मी कोणतेही औषधे घेतल्याशिवाय ४० किलो वजन कमी केले आहे”, असे म्हणत भूमीने तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितले.
