scorecardresearch

Video: भूमी पेडणेकर होणार विवाहबद्ध?, सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनवेळी अभिनेत्रीने सर्वांसमोर ‘त्याला’ केलं किस, व्हिडीओ चर्चेत

रिसेप्शन सिद्धार्थ-किराराचं असलं तरीही आता चर्चा मात्र भूमी पेडणेकरची रंगली आहे.

bhumi pednekar

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्याच आठवड्यात विवाहबद्ध झाले. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. तर रविवारी मुंबईत त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रिसेप्शन सिद्धार्थ-किराराचं असलं तरीही आता चर्चा मात्र भूमी पेडणेकरची रंगली आहे.

रविवारी मुंबईत झालेल्या सिद्धार्थ-किराराच्या रिसेप्शनला रोहित शेट्टी, अलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अंबानी दाम्पत्य, अभिषेक बच्चन, आशुतोष गोवारीकर अशा कित्येक मंडळींनी हजेरी लावून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील या रिसेप्शनला हजर होती. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलाच, पण या रिसेप्शनदरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओत ती एका व्यक्तीला किस करताना दिसली.

आणखी वाचा : “त्यावेळी माझ्या शरीरावर खूपच कमी कपडे होते आणि…”; भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ सेक्स सीन शूट करतानाचा अनुभव

सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला भूमीने डीप नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता. तिचा हा ड्रेस नेटकरांना अजिबात आवडला नव्हता. त्यावरून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. एकीकडे तिला तिच्या फॅशन सेन्सवरून ट्रोल करण्यात येत असतानाच या रिसेप्शन पार्टीतील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी होती घरी परतण्यासाठी गाडीत बसताना दिसत असून गाडीत बसताना तिने एका व्यक्तीला किस केलं. भूमीला किस करणारा हा मिस्ट्री मॅन कोण हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी तिच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Bhumi kisisng man on sod kiara reception while guards try to cover from BollyBlindsNGossip

हेही वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

भूमीचा हा व्हिडिओ तुफान वायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी आता सिद्धार्थ-कियारानंतर भूमीचा नंबर असंही कमेंट करत म्हटलं. आता या व्हायरल व्हिडीओमुळे भूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2023 at 13:18 IST

संबंधित बातम्या