scorecardresearch

Video: “ड्रेसमध्ये बसणार कशी?” भूमी पेडणेकरचा हटके ड्रेस पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न, ट्रोल करत म्हणाले “हॉलीवूड सेलिब्रिटी…”

हटके ड्रेसमुळे भूमी पेडणेकर ट्रोल, नेटकरी म्हणाले…

bhumi pednekar troll
भूमी पेडणेकर ट्रोल. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेन्टर गाला’चं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. अंबानींच्या या कल्चरल सेन्टरच्या या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. भूमी पेडणेकर ही या सोहळ्याला उपस्थित होती.

भूमीने या खास सोहळ्यासाठी हटके ड्रेस परिधान केला होता. राखाडी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये भूमी दिसून आली. ऑफ शोल्डर ड्रेसवर भूमीने ग्लॅमरस लूक केला होता. केस मोकळे सोडत तिने खड्यांची ज्वेलरी घातली होती. इन्संट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन भूमीचा व्हिडीओ शेअर करण्यात आाला आहे. या व्हिडीओमध्ये भूमी पापाराझींना पोझ देताना दिसत आहे.

हेही वाचा>> “…तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल”, केतळी चितळेने व्यक्त केली भीती; नेमकं काय म्हणाली?

हेही वाचा>> Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

भूमीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परंतु, तिचा हा हटके ड्रेसमधील लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भूमीला ट्रोल केलं आहे. “हॉलिवूड सेलिब्रिटी चांगले कपडे घालून आले आहेत आणि बॉलिवूडकर इज्जत घालवत आहेत”, असं एकाने म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांना भूमी पेडणेकर या ड्रेसमध्ये कशी बसणार? असा प्रश्न पडला आहे.

bhumi pednekar troll

“याला म्हणतात कोंबडी अडकली टोपलीमध्ये” अशी कमेंट एकाने केली आहे.

bhumi pednekar troll

“उर्फीचं प्रो मॅक्स व्हर्जन..” असंही एकाने म्हटलं आहे.

bhumi pednekar troll

“फॅशनच्या नावाखाली काहीही करतात” अशी कमेंटही एकाने केली आहे.

bhumi pednekar troll

भूमी पेडणेकर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमीने अनेक चित्रपटांत काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 15:00 IST

संबंधित बातम्या