Amitabh Bachchan proud post for India : बॉलीवूडचे मेगास्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक दशके ते प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असून, बिग बी आजही तेवढ्याच उत्साहाने काम करीत आहेत. अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अमिताभ बच्चन हे दररोज चाहत्यांची संवाद साधत असतात. डेली ब्लॉग शेअर करून अमिताभ हे त्यांच्या भावना आणि अनुभव शेअर करीत असतात.

यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देशासाठी खास पोस्ट केली आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी देशाबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला. भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेवर भाष्य करताना, आनंद वाटत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.

अमिताभ बट्चन यांनी वापरला एक खास शब्द

अमिताभ बच्चन हे दररोज ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करीत असतात. तसेच चाहत्यांशी रोज संवाद साधत असतात. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी केलेल्या ब्लॉगमध्ये देशाचा अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारताबद्दल व्यक्त झालेल्या एका खास शब्दप्रयोगाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘भारत – संकटांनंतर अधिक सक्षम होणारे राष्ट्र’ (India Anti-Fragile) हा शब्दप्रयोग खूप आवडला असून, हे ऐकून चांगले वाटत असल्याचे बिग बी म्हणाले आहेत.

अमिताभ यांची भारतासाठी अभिमानास्पद पोस्ट

अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले आहे की, आजचा भारत हा पूर्वीसारखा कमकुवत किंवा सहज दबावाखाली येणारा देश राहिलेला नाही. भारताकडे आता जग एका मजबूत, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र म्हणून पाहत आहे. सहज तुटणारा, घाबरणारा किंवा धमक्यांना बळी पडणारा देश अशी भारताची प्रतिमा राहिलेली नाही. उलट भारत आता अधिक शक्तिशाली, खंबीर आणि कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सक्षम राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे, असे लिहीत अमिताभ बच्चन यांनी देशाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

अमिताभ बच्चन पहाटे ४ वाजेपर्यंत राहतात जागे

बॉलीवूडचे महानायक व प्रेक्षकांचे लाडके अभिनेते अमिताभ बच्चन हे ब्लॉग शेअर करीत चाहत्यांशी संवाद साधत असतात. त्यांनी आजपर्यंत ६,६८९ ब्लॉग्स लिहिले आहेत. मात्र, त्यांची ब्लॉग शेअर करण्याची वेळ ही पहाटे ४ वाजताची आहे. त्यावरून चाहत्यांनी चिंता व्यक्त करीत असतात. आजही अमिताभ यांनी त्यांच्या राहत्या घरी ‘जलसा’मधून पहाटेच्या सुमारास ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ बच्चन हे अनेकदा रात्रभर जागे राहतात आणि पहाटे ४ वाजता ब्लॉग शेअर करुन झोपतात. अमिताभ बच्चन यांनी आणखी एका ब्लॉगमध्ये ते पहाटे ४ पर्यंत जागे राहत असल्याचे सांगितले आहे. ८३ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी ते पहाटेपर्यंत काम करीत असल्याचे नमूद केले. पहाटे ४ वाजेपर्यंत काम करीत होतो आणि आता पुन्हा कामासाठी तयार आहे, अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली होती.