‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या आहेत. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अभिनेता पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा आहे. पण बॉक्सऑफिसच्या आकड्यांमध्येही ते दिसून येत आहे का? अजय देवगणचा ‘भोला’ अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत कसा परफॉर्म करत आहे जाणून घेऊया.

हेही वाचा- “शाहरुख खान अपयशी…” अनुभव सिन्हा यांनी सांगितलं ‘रा.वन’ चित्रपट फ्लॉप होण्यामागील कारण

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

ॲडव्हान्स बुकिंग सुरू

रविवारपासून ‘भोला’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अजयने स्वतः स्टार तब्बूसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली. त्यानंतर अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाची तिकिटे ॲडव्हान्स बुकींगच्या दृष्टीने विकली जाऊ लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण स्टार भोला चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाल्यापासून २-३ तासांच्या आत देशभरात IMAX आणि 4DX आवृत्तीसह १२०० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच ७ लाखांहून अधिक कमाई केली. ते केलं ‘भोला’ ३० मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हीच परिस्थिती राहिली तर हा चित्रपट १० दिवसांत आगाऊ बुकिंगच्या मोठी कमाई करु शकतो.

हेही वाचा- जन्मतःच राणी मुखर्जीची पंजाबी मुलाशी झालेली अदलाबदल; डोळे पाहून आईने घातलेला गोंधळ, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

कशी आहे भोला चित्रपटाची कथा?

अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे, ‘भोला’च्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे जो १० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो. परंतु त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.