बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानबरोबर एकदातरी चित्रपटात झळकण्याची संधी मिळावी असं स्वप्न अनेक जण पाहतात. सध्या सलमानच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात बिग बॉसच्या घरातील एक जुना स्पर्धक झळकणार आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस १७’मधील यूट्यूबर अरुण माशेट्टी आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरुणचा चाहता वर्ग फार वाढला. या यूट्यूबरने आता थेट सलमानच्या सिकंदर चित्रपटात काम करण्याचा मान मिळवला आहे.

अरुणने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल माहिती देणारे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अरुणने ड्रायव्हरचे सफेद कपडे परिधान केले आहेत. अरुणने यावेळी त्याच्या पत्नीसह सलमान खानबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. इतकेच नाही तर त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सलमानच्या भेटीचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. यात अरुण पत्नीसह शूटिंगचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : तब्बल ५ वर्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एन्ट्री; अर्चना म्हणाली, “माझ्या खुर्चीवर कब्जा…”

अरुणने या व्हिडीओमध्ये म्हटलं की, “हैदराबादमध्ये सलमानच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचा मी एक भाग आहे. आज मला सलमान खान यांना भेटायचं आहे. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की, एकदातरी आपली सलमान खानबरोबर भेट व्हावी. मी या आधी बिग बॉसच्यावेळी सलमान खान यांना भेटलो आहे. आतासुद्धा भेटल्यावर ते मला ओळखतील आणि माझ्याशी बोलतील. मी हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहे.”

व्हिडीओमध्ये तो पुढे त्याला दिलेले डायलॉगसुद्धा पाठ करताना दिसत आहे. ‘राणी साहिबा का क्या हुआ…’ असा डायलॉग अरुण बोलत आहे. त्याने यावेळी मेकअपची टीम त्याची कशी काळजी घेतात याचीसुद्धा एक झलक दाखवली आहे. तसेच पुढे त्याने यात असंही म्हटलं आहे की, “व्हिडीओ काढण्याची मला परवानगी दिली आहे याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सर्व काही सांगेन, त्यामुळे ‘सिकंदर’ नक्की पाहा.”

हेही वाचा : Video : “आयुष्यातला अंधार…”, सावली आणि सारंगचे लग्न होणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ईदच्या शुभदिनी सिकंदर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमानसह मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. आतापर्यंत चित्रपटाचा एक ट्रेलर आणि एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चाहत्यांकडून सलमान आणि रश्मिका या जोडीला भरभरून प्रेम मिळत आहे.

Story img Loader