Rakesh Bapat Ex Girlfriend Shamita Shetty Dating Rumours : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे कामाच्या निमित्ताने भेटले. परंतु, कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी लग्नसुद्धा केलं. तर काही कलाकार असेही आहेत, जे एका प्रोजेक्टनिमित्त भेटले होते आणि ते प्रेमात पडले; पण त्यांचं नातं काही फार पुढे जाऊ शकलं नाही. त्यापैकी एक जोडी म्हणजे मराठमोळा अभिनेता राकेश बापट आणि शमिता शेट्टी.
शमिता शेट्टी शिल्पा शेट्टीची बहीण असून, ती अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. तिने ‘बिग बॉस’ ओटीटी आणि ‘बिग बॉस’ सीझन १५ मध्ये सहभाग घेतला होता. त्या पर्वात राकेश बापटही सहभागी झालेला. त्यावेळी दोघे एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु, माध्यमांच्या वृत्तानुसार जुलै २०२२मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. अशातच आता शमिता शेट्टी पुन्हा डेटिंग करीत असल्याची चर्चा आहे.
शमिता शेट्टी कोणाला डेट करतेय?
शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त दीपेश शर्मा नावाच्या टेक्नो आर्टिस्टने तिच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी दोघांबरोबर शिल्पा शेट्टीसुद्धा पाहायला मिळत आहे. यावेळी त्याने “वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला माझ्याबद्दल सगळं काही माहीत असूनही तू माझ्याबरोबर आहेस लव्ह यू”, अशी कॅप्शन दिली आहे. त्यावर शमिताने रेड हार्टचे इमोजी पोस्ट करीत कमेंट केली आहे. त्यामुळे हे दोघे डेट करत आहेत का, अशी चर्चा आता सुरू आहे. अद्याप या दोघांनी याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शमिताने जुलै २०२२ मध्ये राकेश बापटबरोबर ब्रेकअप झाल्याचं इन्स्टाग्रामवर स्टोरी पास्ट करत सांगितलेलं. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार तिने “मला याबद्दल स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं आहे, असं वाटतं. राकेश बापट आणि मी वेगळे झाले आहोत. तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं, त्यासाठी धन्यवाद असंच प्रेम करत राहा.” असं म्हटलेलं.
दरम्यान, राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६मुळे चर्चेत आहे. अभिनेता ‘बिग बॉस’मधील घरात घडणाऱ्या गोष्टीमुळे तो सतत चर्चेत असतो.

