Bipasha Basu Milk Worms FDA Tukaram Mundhe: महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायांमुळे चर्चेत आले आहेत. बॉलीवूडमधून तुकाराम मुंढेंच्या कामाचे कौतुक होत आहे. त्यामध्ये आता अभिनेत्री बिपाशा बासूने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करीत तिने विकत आणलेल्या दुधामध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघड केला आहे.

बिपाशा बासू ही आता सिनेमांमधून सक्रिय नसली तरी सोशल मीडियावरून अपडेट शेअर करत असते. नुकताचे तिने इन्स्टाग्रामवर दुधाचा ग्लास हातात घेतलेला व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने दुधाचे नवीन पॅकेट आणले असून, त्यामध्ये लहान-लहान अळ्या आढळून आल्याचे दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये बिपाशाने स्वतः दुधातून अगदी बारीक अशा अळ्या काढून, बोटावर त्या दाखवल्या आहेत. त्यासह तिने FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले आहे.

तुकाराम मुंढेंना काय म्हणाली बिपाशा बासू?

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बिपाशा बासूने तुकाराम मुंढे यांना टॅग करीत लिहिले, “आम्ही खरेदी करत असलेले कोणतेही अन्नपदार्थ हे खराब किंवा भेसळयुक्त मिळणार नाहीत, अशी फक्त तुमच्याकडूनच आशा आहे.” अशा आशयाचे कॅप्शन लिहीत बिपाशाने थेट तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Actress Bipasha Basu showing worms in milk glass video tagging FDA Commissioner Tukaram Mundhe in Instagram story
बिपाशा बासू इन्स्टाग्राम स्टोरी

तुकाराम मुंढे यांना सिनेविशवातून पाठिंबा

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर राज्यामध्ये भेसळयुक्त व खराब अन्नपदार्थ देणाऱ्या हॉटेल्सवर छापे मारले आहेत. अन्नपदार्थांची सुरक्षा आणि भेसळीविरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी अगदी अनेक कॅन्टीनवरही त्यांनी धाडी टाकल्याने सर्वसामान्यांना सुरक्षित अन्न मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाला बॉलीवूड आणि मालिकाविश्वातून मोठा पाठिंबा दिला मिळतोय. यापूर्वी रवीना टंडन, ट्विंकल खन्ना, परेश रावल आणि सुनील लहरी अशा अनेक सिनेविश्वातील कलाकारांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाला पाठिंबा देत त्यांचे कौतुक केले आहे.