scorecardresearch

“मला सेक्सी आजी म्हणून…” बिपाशा बासूने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा

तिने केलेल्या चित्रपटांमुळे तिच्यावर ‘सेक्सी’ हा शिक्का बसला तो कायमचाच

“मला सेक्सी आजी म्हणून…” बिपाशा बासूने व्यक्त केली मनातली सुप्त इच्छा
फोटो : सोशल मीडिया

‘अजनबी’, ‘जिस्म’सारख्या चित्रपटातून पुढे आलेल्या अभिनेत्री बिपाशा बासुचा आज वाढदिवस. ४४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बिपाशाचा चाहतावर्ग चांगलाच मोठा आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने केलेल्या चित्रपटांमुळे तिच्यावर ‘सेक्सी’ हा शिक्का बसला तो कायमचाच. याबाबतच बिपाशाने नुकताच खुलासा केला आहे.

‘रेडिफ.कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिपाशाने पूजा भट्ट दिग्दर्शित ‘जीस्म’ या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. जेव्हा बिपाशाने हा चित्रपट केला तेव्हा एखाद्या अभिनेत्रीने एवढ्या बोल्ड आणि धाडसी चित्रपटात काम करणं हे तसं नवीनच होतं. असे चित्रपट न करण्याचा बऱ्याच लोकांनी तेव्हा बिपाशाला सल्ला दिला होता.

आणखी वाचा : बाबील आणि इरफान यांच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा; ‘या’ कारणामुळे धरला होता अभिनेत्याने वर्षभर अबोला

तरीही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बिपाशाने असे चित्रपट स्वीकारले आणि लोकांचे म्हणणे खोडून काढले. बिपाशा म्हणाली, “माझ्या मॅनेजरने मला विचारलं की तू हे चित्रपट का स्वीकारत आहेस, हे फार घातक आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी सुज्ञ आणि प्रौढ आहे, अशाप्रकारची भूमिका आजवर हिंदी मनोरंजनसृष्टीत झालेली नाही त्यामुळेच मी अशा भूमिका स्वीकारल्या आहेत.”

‘जीस्म’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच हीट ठरला, आणि या चित्रपटाने अभिनेत्यांनीसुद्धा अशा बोल्ड आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यात पुढाकार घ्यायला सुरुवात केली हे बिपाशाने स्पष्ट केलं. पुढे ती म्हणाली, “जेव्हा लोक तुम्हाला सेक्सी म्हणून संबोधतात, तेव्हा बऱ्याच लोकांच्या मनात विचित्र विचार येतात. माझ्यामते एखाद्या व्यक्तीकडे सेक्स अपील नसेल तर ती व्यक्ती प्रचंड बोरिंग आहे. सेक्सी हा एक प्रकारचा रुबाब आहे, आणि ते तुमच्यात उपजतच असावं लागतं. मला ‘सेक्सी’ हे बिरुद मिरवायला कधीच लाज वाटणार नाही. मला सेक्सी राहूनच मृत्यू यावा, मला माझ्या नातवंडांची सेक्सी आजी म्हणून मिरवायला आवडेल. यासाठी मी काही खास मेहनत घेतलेली नाही, हे सगळं नैसर्गिकरित्याच मला मिळालं आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या