अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांच्यासाठी खास ठरलं. १२ नोव्हेंबर करण आणि बिपाशाच्या घरी लग्नाच्या जवळपास ६ वर्षांनंतर मुलीचा जन्म झाला. लेकीच्या जन्मानंतर बिपाशाने चाहत्यांना तिच्या नावाची माहिती दिली होती. बिपाशाने लेकीचं नाव 'देवी' असं ठेवलं. अभिनेत्रीनं ठेवलेल्या मुलीच्या नावावर चाहते खूप खूश आहेत. त्यावेळी अनेकांनी बिपाशाकडे लेकीचा चेहरा दाखवण्याची मागणी केली होती. आता चाहत्यांची इच्छा पूर्ण करत बिपाशाने लेक देवीची पहिली झलक दाखवली आहे. १२ नोव्हेंबरला आई-बाबा झाल्यानंतर बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी मुलीच्या जन्माची माहिती देतानाच तिच्या नावाचा खुलासाही केली होता. दोघंही मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहेत. या नव्या प्रवासासाठी दोघंही उत्साही आहेत. तर दुसरीकडे बिपाशाचे चाहते मुलगी देवीची पहिली झलक पाहण्यासाठी खूप आतुर झाले होते. अशात आता बिपाशाने मुलगी देवीची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. बिपाशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक गोड फोटो शेअर केला आहे. आणखी वाचा- Photos: डेटिंगच्या अफवा, लग्न अन् ६ वर्षांनी झाले पालक; बिपाशा-करणची लव्हस्टोरी आहे खूपच इंटरेस्टिंग बिपाशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये करण सिंह ग्रोवरने आपल्या छोट्या राजकुमारीला हातत पकडलेलं दिसत आहे. तर बिपाशा बासू प्रेमाने आपल्या लेकीकडे पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बिपाशाने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, "स्विट बेबी एंजल बनवण्याची आमची रेसिपी. अर्धा कप तू आणि अर्धा कप मी, अर्धा कप आईचं खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद, ३ थेंब इंद्रधनुष्याचे आणि त्यानंतर क्यूटनेट आणि यमीनेस चवीनुसार…" अर्थात या फोटोमध्ये हार्टशेपचा वापर करत बिपाशाने आपल्या लेकीचा चेहरा लपवला आहे. आणखी वाचा- बेबी बंप फ्लॉन्ट करत बिपाशा बासूने केलं आजवरचं सगळ्यात बोल्ड फोटोशूट, गरोदरपणातील ‘तो’ लूक व्हायरल बिपाशाने शेअर केलेला देवीचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. चाहते छोट्या देवीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या ६ वर्षांनंतर बिपाशा आई झाली आहे. ज्यामुळे दोघंही खूप खूश आहेत.