Bipasha Basu’s daughter Devi Video: बॉलीवूड कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. आपले आवडते कलाकार कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, याची चाहते आतुरतेने वाट बघतात.

व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यांची जीवनशैली कशी असते, ते दैनंदिन जीवनात काय करतात, त्यांची मुले कशी दिसतात, ती काय करतात, ते कोणत्या शाळेत जातात, त्यांना भविष्यात त्यांच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे का हे आणि असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात.

काही कलाकार त्यांच्या मुलांचे चेहरे दाखवणे टाळतात. काही कलाकार त्यांच्या मुलांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करतात, विविध मुलाखतींमध्ये ते त्यांच्याबद्दल बोलतात. पण, कलाकारांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आता बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची मुलगी देवी चर्चेत आली आहे. बिपाशा आणि करण देवीच्या जन्मापासूनच तिचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात.

बिपाशा बासूने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ

आता बिपाशाने तिच्या मुलीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, देवी झोपण्याआधी एक गोष्ट नक्की करते. देवी झोपण्याआधी दोन्ही हात जोडून एक छोटीशी प्रार्थना म्हणत असल्याचे दिसत आहे. तिला मिळालेल्या सगळ्या गोष्टींसाठी ती देवाचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे दिसत आहे.

बिपाशा अनेकदा तिच्या मुलीचे विविध व्हिडीओ शेअर केरते. ती काही नवीन गोष्टी शिकताना दिसते. तसेच सुट्ट्यांमधील, विविध लूकमधील देवीचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर ती शेअर करते.

बिपाशाने २००१ मध्ये बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ‘अजनबी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ३० एप्रिल २०१६ ला बिपाशा बासूने करण सिंग ग्रोव्हरबरोबर लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांना मुलगी झाली, तिचे नाव देवी असे आहे.

देवीबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा, तसेच करिना कपूर खान आणि सैफ अली खानची मुले जेह आणि तैमूर तसेच शाहिद कपूर व मीरा राजपूत यांची मुले लोकप्रिय आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

दरम्यान, बिपाशा आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.