मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या आदिपुरुष या चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या लूकबद्दलही खिल्ली उडवली आहे. तर काहींनी या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबत टीका केली आहे. पण आता या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. भाजप नेते राम कदम यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम कदम यांनी नुकतंच याबद्दल दोन ट्वीट केले आहेत. यात त्यांनी आदिपुरुष या चित्रपटाला विरोध केला आहे. “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

त्यांनी आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवायलाच हवा. अशाप्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कायमची बंदी किंवा संबंधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्ष बंदी घालण्यात यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं करण्याची हिंमत करणार नाही. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.”

आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

दरम्यान आदिपुरुष हा चित्रपट विविध ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. याचे बजेट ५०० कोटी असल्याचे बोललं जात आहे. येत्या १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ram kadam tweet adipurush movie controversy wont tolerate hindu sentiments being hurt nrp
First published on: 06-10-2022 at 10:56 IST