scorecardresearch

Premium

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार बॉबी देओल; त्याचा जबरदस्त लूक पाहून चाहते म्हणाले, “सिस्टम हँग केलं…”

रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या

Bobby Deol first look posters from Ranbir Kapoor starrer Animal
रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या

अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी चित्रपटातील कलाकार मंडळीचे पहिली झलक प्रदर्शित केली जात आहे. अलीकडेच ‘अ‍ॅनिमल’ मधील रणबीर कपूर, अनिल कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या पहिला लूक समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याचा जबरदस्त लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा – “मनमोहन सिंगांनी निधड्या छातीनं…”, किरण मानेंनी माजी पंतप्रधानांसाठी केली पोस्ट; म्हणाले, “मरणाच्या दारात…”

jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर घालणार धुमाकूळ; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
shahrukh khan upcomig dunki unofficial remake of Dulquer Salmaan malayalam movie cia
‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे शाहरुख खानचा ‘डंकी’? सोशल मीडियावर होतोय ट्रोल
prasad
अखेर कोडं सुटलं! ‘जिलबी’ चित्रपटात प्रसाद ओकबरोबर दिसणार ‘हे’ आघाडीचे मराठी कलाकार
barbie
सुपरहिट ‘बार्बी’ आता घरबसल्या पाहता येणार! ‘या’ ओटीटी प्लेफॉर्मवर चित्रपट दाखल, पण…

अभिनेता बॉबी देओलचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील जबरदस्त लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रक्ताने माखलेला बॉबी देओलचा चेहरा पाहायला मिळत आहे. “अ‍ॅनिमल का एॅनिमी” असं कॅप्शन देत बॉबीनं चित्रपटातला पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक

बॉबी देओलच्या हा लूक बॉलीवूडच्या कलाकार मंडळींसह त्याचा चाहत्यांना खूप आवडला आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “मी रणबीरसाठी नाही तर तुझ्यासाठी हा चित्रपट पाहणार आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “रॉकस्टार.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “सर तुम्ही तर सिस्टम हँग केलं.”

हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा – लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र वीएफएक्समुळे ‘अ‍ॅनिमल’चं प्रदर्शनं पुढे ढकलण्यात आलं आहे. वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट असल्यामुळे दिग्दर्शकला या चित्रपटासाठी अजून वेळ हवा होता. त्यामुळे निर्मात्यांनी ‘अ‍ॅनिमल’ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून १ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bobby deol first look posters from ranbir kapoor starrer animal movie pps

First published on: 26-09-2023 at 14:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×