‘बरसात’ चित्रपटातून १९९५ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजेच बॉबी देओल(Bobby Deol). हमराज, दोस्ती, चोर मचाये शोर, पोस्टर बॉईज, यमला पगला दिवाना फिर से, रेस ३ अशा अनेक चित्रपटांतून बॉबी देओलने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने चित्रपटांपासून अंतर ठेवल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील त्याच्या लूक व भूमिकेने अभिनेता पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. चित्रपटातील ‘जमाल कुडू’ हे गाणेदेखील चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. आता अभिनेत्याने या गाण्याच्या डान्स स्टेपमागे काय प्रेरणा होती, याबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला बॉबी देओल?

बॉबी देओल व सनी देओल यांनी स्क्रीम लाइव्ह इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जमाल कुडू गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगताना बॉबी देओलने म्हटले, “मला आजही त्या गाण्याचे शूटिंग आठवते. संदीपने मला सीन समजावून सांगितला. त्याने म्हटले की, हे तुझे लग्न आहे आणि तुला डान्स करायचा आहे. मी त्यांना म्हटले की, मी कोरिओग्राफरबरोबर डान्स करू शकत नाही आणि मी डान्स करायला सुरुवात केली. संदीपने कट, असे म्हणत सीन थांबवला आणि म्हणाला, “माझे पात्र बॉबी देओलसारखे दिसले नाही पाहिजे. ते अबरारसारखे दिसले पाहिजे.” मी विचार केला की, आता काय करू शकतो. मी सौरभ सचदेवाकडे गेलो; ज्याने चित्रपटात माझ्या भावाची भूमिका साकारली आहे. मी त्याला विचारले की, तू कसा डान्स करतोस? त्याने डान्स करायला सुरुवात केली आणि अचानक काय झाले माहीत नाही. पण, माझ्या अनेक वर्षांपासूनच्या आठवणी मनात येऊ लागल्या.”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

“मी लहान असताना हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुटीसाठी पंजाबला जात असे. रात्रीच्या वेळी तिथे पुरुष दारू पीत असत. अचानक गाणे वाजायला सुरुवात व्हायची आणि ते त्यांच्या डोक्यावर ग्लास व बाटली ठेवून डान्स करायचे. तर मी स्वत:ला म्हटले की, हे करण्याचा आपण प्रयत्न करून बघू. कारण- मी याआधीदेखील हे केले आहे. ती डान्स स्टेप इतकी लोकप्रिय होईल, याची मला थोडीही कल्पना नव्हती. मी फक्त माझ्या डोक्यावर ग्लास ठेवला आणि डान्स करायला सुरुवात केली. मला समजलं की हे व्हायरल होणार आहे”, अशी आठवण बॉबी देओलने सांगितली आहे.

बॉबी देओलच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर, अभिनेत्याने १९७७ ला ‘धरम वीर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. १९९५ ला त्याने राजकुमार संतोषी यांच्या ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला मोठे यश मिळाले. त्याचा दुसरा चित्रपट ‘गुप्त : द हिडन ट्रूथ’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ऐश्वर्या रायबरोबरचा त्याचा और प्यार हो गया हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे काही काळ बॉबी देओल चित्रपटांत दिसला नाही. मात्र, अभिनेत्याने ‘रेस ३’, ‘यमला पगला दिवाना फिर से’ व ‘हाऊसफुल ४’, या चित्रपटांतून पुनरागमन केले. ‘क्लास ऑफ ८३’ या चित्रपटांतून त्याने ओटीटीवर पदार्पण केले. आश्रम या वेब सीरिजमध्ये त्याने निभावलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक केले. तर ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातून त्याला पुन्हा एकदा मोठी लोकप्रियता मिळताना दिसली.

हेही वाचा: २०२४ मध्ये OTT वर आलेल्या ‘या’ सर्वोत्तम वेब सीरिज तुम्ही तुम्ही पाहिल्यात का?

आता प्रेक्षक बॉबी देओलला नवीन चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Story img Loader