Bobby Deol On Sunny Deol Diet: बॉबी देओल लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याला या चित्रपटातील भूमिका तितकी आवडली नाही, तसेच आलिया भट्टबरोबर त्याचे मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच, बॉबीने अनेकविध विषयांवर वक्तव्य केले. त्याचे खासगी आयुष्य, त्याला लागलेले दारूचे व्यसन आणि पत्नीने दिलेली साथ याबद्दल अभिनेत्याने वक्तव्य केले आहे. याबरोबरच त्याने त्याचा मोठा भाऊ सनी देओलबद्दलही वक्तव्य केले.

सनी देओल व बॉबी देओल या दोन भावांमध्ये कायमच उत्तम बॉण्डिंग असल्याचे दिसते. ते कायम एकमेकांना पाठिंबा देतात. एकमेकांना मदत करतात. तसेच, एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. चाहते त्यांच्या या बॉण्डिंगचे नेहमी कौतुक करताना दिसतात. बॉबी देओल वेळोवेळी सनी देओलच्या कामाबद्दल, तसेच त्याच्या फिटनेसबद्दल बोलतो, त्याचे कौतुक करतो.

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी त्याच्या तरुणपणी कोणत्या पदार्थांचे सेवन करत असे, याबद्दल वक्तव्य केले आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“फक्त दूधच नाही तर मी…”

बॉबी देओलने नुकतीच ‘आप की अदालत’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला विचारले की तू २०-२० ग्लास दूधाचे सेवन करायचास का? यावर बॉबी म्हणाला, “हो, हे अगदी खरे आहे. माझं असं असायचं की किचनमध्ये सगळ्यात मोठा ग्लास कोणता आहे, त्यामध्ये मी दूध पिणार. फक्त दूधच नाही तर मी लस्सी आणि ज्यूसही प्यायचो. माझ्या भावला या गोष्टी आवडायच्या नाहीत, तो दूध झाडामध्ये ओतून द्यायचा.”

बॉबी देओलने दिलेल्या या उत्तरावर त्याला विचारले की, सनीकडे पाहून वाटत नाही की त्याला दूध किंवा तूप आवडत नाही. त्यावर बॉबी देओल म्हणाला, “त्याला लहानपणी हे सगळं आवडायचं नाही. पण, जेव्हा आम्ही मोठे झालो, तेव्हा त्याला दूध, लस्सी या गोष्टी आवडायला लागल्या. आपल्याला सांगितलं जातं ना की दूध प्यायलं तर तुम्ही उंच व्हाल, तुमची ताकद वाढेल”, असे म्हणत सनीच्या आहारात त्याच्या तरुणपणी दूध, लस्सीचा समावेश असायचा असे बॉबीने सांगितले.

सनी व बॉबी देओल या भावंडांनी स्क्रीनदेखील शेअर केली आहे. त्यांनी ‘दिल्लगी’, ‘२३ मार्च १९३१: शहीद’, ‘अपने’, ‘हिरोज’, ‘यमला पगला दीवाना’, ‘यमला पगला दीवाना २’, ‘पोस्टर बाईज’, ‘यमला पगला दिवाना फिर से’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

दरम्यान, बॉबी देओलच्या ‘अल्फा’ चित्रपटातील भूमिकेबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.